जामखेड न्युज——
माजी विद्यार्थी म्हणून गटशिक्षणाधिकारी धनवे यांनी शाळेला मदत करत दाखवले सामाजिक दातृत्व!!
जामखेड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयास सदिच्छा भेट दिली. शालेय परिसर, विद्यालयाची इमारत व विद्यालयाची शैक्षणिक प्रगतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विद्यालयातील विहीर कामासाठी पाच हजार रुपयांची मदत केली यामुळे त्यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन विद्यालयाचा माजी विद्यार्थी या नात्याने विद्यालयात चालू असलेल्या विहीर कामासाठी रु.5001/- देणगी दिली.
याप्रसंगी जामखेडचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम चांडे, माजी प्राचार्य रमेश वराट, दीपक तुपेरे, दिपक पवार, जाधव, संजू शेळके, तांबे सर, शशिकांत गडदे, नवनाथ आडे , भागवत चांगुणे, दत्ता कसबे, मच्छिंद्र श्रीरामे, गावडे मारुती, खताळ, हमीद तांबोळी त्याचप्रमाणे, माने मॅडम, खताळ मॅडम विद्या निंबोरे मॅडम सौ.एस एस शिंदे मॅडम श्रीम.व्ही.ए.नवले मॅडम श्रीम.के के कदम मॅडम,श्रीम.ऋचा गोस्वामी मॅडमश्री. संजय राऊत, दादा ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.