जामखेड न्युज——
जातेगाव घाटात बिबट्याचे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण
नागरिकांनी काळजी घ्यावी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके
जामखेड तालुक्यातील जातेगाव घाटात चार बिबट्यांचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १० आँगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास जातेगावचे सरपंच रविराज गायकवाड, त्यांचे सहकारी सुनील सखाराम गायकवाड हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास मोहरीच्या घाटातून गावाकडे चालले असता त्यांना चार बिबटे आढळून आले. वनविभाग बिबट्याचा शोध घेत आहे. नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी केले आहे.
एक बिबट्या त्यांच्या वाहनासमोर आला. त्यांनी कार थांबविली. त्याला रस्ता क्रॉस करून दिला. त्यावेळी इतर दोन बिबटे कारच्या पाठीमागून गेले. एक बिबट्या रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसला होता. हे बिबटे दिघोळकडून मुंगेवाडी डोंगराकडे जाताना दिसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मध्यंतरी गतवर्षी बिबट्यांनी नायगाव येथे दोन वानर चार वासरांना ठार केले होते. त्यानंतर काही बिबटे खर्डा किल्ला परिसरात दिसून आले. धामणगाव येथे बिबट्याचे मृत पिल्लू आढळून आले होते. गतवर्षी वनविभागाने पिंजरे लावले होते. परंतु, एकही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नव्हता.
चौकट