जामखेड न्युज——
स्वातंत्र्य दिनानिमित्त हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मध्ये मोफत दातांची तपासणी व एक्स रे शिबीर
डॉ. सागर शिंदे यांच्या हेल्थ दातांचा दवाखाना आणि सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. १४ आँगस्ट व १५ आँगस्ट या दोन दिवशी सकाळी १० ते ५ पर्यंत मोफत दातांची तपासणी व एक्स रे शिबीर आयोजित करण्यात आले आहे तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटलचे संचालक डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांनी केले आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध सुविधा
डिजिटल एक्स रे द्वारे दंत रोगाचे अचूक निदान व उपचार
वेदनाविरहित रूट कॅनाल ट्रिटमेंट दात बसवणे, (पक्के दात व कवळी)
अक्कल दाढ व हिरड्यांची शस्त्रक्रिया
दातांमध्ये चांदी बसवणे
दात साफ करणे
तारांच्या साहाय्याने दात सरळ करणे
शिबीराचे ठिकाण नवीन बस स्टँड समोर खाडे नगर गाळा नंबर २
१४आँगस्ट व १५ आँगस्ट रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत राहिल
हेल्थ दातांचा दवाखाना आणि सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉ.सागर कुंडलिक शिंदे MDS ( Gold medalist) आणि त्यांच्या पत्नी डॉ. मयुरी सागर शिंदे (BDS) दंतशल्य विशारद व डॉ.पूजा जवकर BDS हे दातांच्या दवाखान्याच्या माध्यमातून गरजू पेशंटला सुविधा पुरवत आहेत. तिघेही डॉ. अत्यंत हुशार आणि अनुभवी डॉक्टर आहेत त्याचप्रमाणे जामखेड मध्ये होणाऱ्या सार्वजनिक आणि सामाजिक कामांमध्ये ते हिरारीने भाग घेतात. मोफत दंततपासणी शिबीर, तसेच शेकडो अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारून त्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत म्हटले जाते.
संपूर्ण दात पडले तरी पण कोणत्याही वयात आपण पक्के दात बसू शकतो आणि ते यशस्वी होतात हे डॉक्टरांनी दाखवून दिले. अत्याधुनिक दंत उपचार पद्धती आणि उत्कृष्ट उपचार तेही माफक दरात यामुळे अगदी अल्पावधीतच डॉक्टरांनी सुप्रसिद्ध नावलौकिक मिळवला.
Orthodontics diploma course मार्फत डॉक्टरांनी आतापर्यंत 250 हून अधिक पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात यशस्वी झाले.
पूर्वी MDS डॉक्टर जामखेड मध्ये नसल्यामुळे पेशंटला नगरला किंवा बीड, पुण्याला जावे लागत असे. मात्र डॉक्टर सागर शिंदे यांच्या येण्यामुळे ही पोकळी भरून निघाली आणि हजारो पेशंटचा फायदा झाला. आज नवनवीन तरुणांना ज्यांचे दात वेडेवाकडे आहेत किंवा ज्यांना दातामुळे हसता येत नाही अशा अनेक लोकांना ऑर्थरोटिक ट्रीटमेंट म्हणजे दातांना तारा लावणे या मार्फत , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात यशस्वी झाले आहेत.
डॉक्टर मयुरी शिंदे याही अतिशय हुशार डेंटिस्ट आहेत, महिलांमध्ये डॉक्टर मयुरी शिंदे यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या पद्धतीचे खूप कौतुक केले जाते, आज पैसे भेटतील ना भेटतील ,,परंतु पेशंटच्या दातांच्या वेदना बंद करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून त्या काम करत असतात. याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांची समाजसेवा
हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉक्टर सागर शिंदे आणि मयुरी शिंदे यांनी अनेक फ्री डेंटल चेकअप घेतले आहेत. आज पर्यंत त्यांनी बारा फ्री डेंटल चेक अप कॅम्प आणि जामखेड मधील पाच शाळांना डेंटल कॅम्प आणि दवाखान्या मार्फत मार्गदर्शन आणि टूथपेस्ट आणि ब्रश दिलेली आहेत. लहान मुलांमध्ये दात स्वच्छ ठेवण्याची भावना रुजावी आणि त्यांना सवय लावावी यासाठी हे कॅम्प घेतले जातात.
हेल्थ दातांचा दवाखाना येथे उपलब्ध सुविधा
डॉ. सागर कुंडलिक शिंदे हे गेली ११ वर्षे दाताच्या समस्यांसाठी सेवा देताना सुसज्ज हाॅस्पिटलच्या माध्यमातून अॅडव्हान्स रूट कॅनाल(RCT), आर्थोडोटीक ट्रिटमेंट व डेंटल इम्प्लान्ट , लहान मुलांच्या दातांचे रोड काम करणे, सेवेसाठी सतत प्रयत्नशील असतात.
पक्के कृत्रिम दंतरोपण
स्क्रूच्या साहाय्याने पक्के दात बसवणे (डेंटल इम्प्लांन्ट)
दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे
काॅस्मेटीक डेंटिस्ट्री , स्माईल डिझाईनिंग
ओपीजी एक्सरे: जामखेड मधील प्रथमच ओपीजी एक्सरे मशिन डॉक्टरांनी घेतली.
जबड्याचे फ्रॅक्चर काढणे, गाठी काढणे, कॅन्सर निदान दात स्वच्छ करणे, दंत व्यंगोपचार दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे.
चांगल्या दातांच्या आरोग्यासाठी डॉ. सागर शिंदे लोकांना आवाहन केले आहे की
1.व्यसनमुक्त राहणे – तंबाखू, सिगारेट, मावा यापासून दूर राहणे,
2.दाताची स्वच्छता – ब्रश, माउथ वाॅश, 3.डेंटल फ्लॉस नियमित वापरणे,
4.ब्रश तीन महिन्याला बदलणे