आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत – सभापती शरद कार्ले

0
106

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत – सभापती शरद कार्ले

 

मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने शेतक-यांच्या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५३ गावातील १५६०० शेतक-यांना ८ कोटी ७० लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.


मागील वर्षी शासनाने तातडीने पंचनामे केले परंतु, नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना वर्षे उलटले तरीही मिळाली नव्हती त्यासाठी आ प्रा राम शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदेसाहेब, उप-मुख्यमंत्री मा,देवेंद्र फडणवीस,नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत अखेर ही मदत मिळाली आहे.

सदर मदतीसाठी KYC केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत जमा होणार आहे.
आ.प्रा. राम शिंदे साहेब यांनी जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच मागणी मंजुर करत नीधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शेतक-यांना मोठा अर्थिक हातभार लागणार आहे.

जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसान भरपाईचा एक वर्षापासुन रखडलेला प्रश्न मार्गी लावुन तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ प्रा राम शिंदेसाहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदेसाहेब, उप-मुख्यमंत्री मा,देवेंद्रजी फडणवीस,नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकरी वर्गमधून आभार व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here