जामखेड न्युज——
आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे करतायेत मोफत जेवणाची सोय

संविधान दिन, अण्णाभाऊ साठे जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात दरवर्षी जमणाऱ्या हजारो लोकांची जेवनाची व पाण्याची सोय करतात निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे करत आहेत. खरी समाजसेवा करणारा अवलीया म्हणून रमेश आजबे यांच्या कडे पाहिले जाते. तसेच आमदार रोहित पवार हेही मोठ्या प्रमाणात दरवर्षी आर्थिक मदत समाजबांधवांना करत असतात.

कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून अनेक सामाजिक प्रश्न सोडवणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी ते संविधान दिन व अण्णाभाऊ साठे जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर निमित्त शहरात जमणाऱ्या हजारो लोकांची जेवनाची व पाण्याची सोय करतात निरपेक्ष भावनेने खरी समाजसेवा करणारा अवलीया म्हणून रमेश आजबे यांच्या कडे पाहिले जाते.

आण्णाभाऊ साठे जन्मदिनानिमित्त शेकडो लोकांच्या जेवणाची व पाण्याची सोय समाजसेवक रमेश दादा आजबे यांनी केली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव, सावळेश्वर उद्योग समुहाचे उद्योजक रमेश (दादा) आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने, प्रा.लक्ष्मण ढेपे, नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपाचे युवा नेते जमीर बारुद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, भारतीय बौद्ध महासभेचे महिला तालुकाध्यक्ष सुरेखा सदाफुले इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, भिमटोला ग्रुपचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, नगराध्यक्ष निखिल घायतडक,माजी संचालक सागर सदाफुले, वैजीनाथ पोले, नगरसेवक अर्शद शेख, नगरसेवक अमित जाधव, डाॅ.प्रदीप कात्रजकर, शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरभाई कुरेशी, वसीम सय्यद,प्रा.राहुल आहेर,मनसेचे सनी सदाफुले, अमोल गिरमे,नितीन हुलगुंडे, लखन मिसाळ,रवी सोनवणे, विजयकुमार जाधव, सुरज डाडर,सिंध्दात डाडर, सचिन सदाफुले, अमर जाधव, आकाश साठे, दादा मोरे, करण घायतडक आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आजपर्यंत मंदिर जिर्णोद्धार, रंगकाम, वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, गटारे बांधकाम, अनेक ठिकाणी लाईटची सोय, महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावीक भक्तांसाठी फराळाची सोय, अनेक शिवरस्ते, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, झाडांना संरक्षक जाळी, उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, अनेक शाळांना होम थिएटर, कबड्डी, क्रिकेट टीमसाठी कीटचे वाटप, कोरोना काळात अनेकांना मास्क, सॅनिटाजर, किराणा कीटचे वाटप, भारतीय संविधान दिनानिमित्त स्नेह भोजन, मकरसंक्रांत निमित्त विविध कार्यक्रम, रक्षाबंधन निमित्त झाडांना राखी बांधणे, भक्ती शक्ती महोत्सवात मंडप व लाईटची व्यवस्था
संपर्क शहरात दुकानदारांना डस्टबिन वाटप, स्वच्छता अभियान लोकचळवळ बनविली हरित जामखेड साठी अनेक ठिकाणी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले, रमजान ईदमध्ये मुस्लिम बांधवांना फळे वाटप, अनेक ठिकाणी शाळांना मदत सारोळा येथे शाळेस गेट बसवून दिले, बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालयास जोडणारा तीस वर्षांपासून चा बंद रस्ता चालू करून पेव्हिंग ब्लॉक बसवले लाईटची सोय केली ग्रामीण रुग्णालय बोअरवेल घेऊन मोटार बसवून दिली लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली या सह अनेक अशी सामाजिक कामे मार्गी लावली.
कोट्यावधी रूपयांची पदरमोड करून खरे सामाजिक काम करणारा सच्चा समाजसेवक म्हणून रमेश (दादा) आजबे यांची ओळख आहे. शहरासह परिसरात कोणाला काही अडचण आली तर लोक हक्काने रमेश आजबे यांना सांगतात आणि त्यांच्या कडून ती अडचण सुटते.
अनेक वर्षांपासून ते संविधान दिन व आण्णाभाऊ साठे जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व लोकांची जेवन व पाण्याची सोय करतात. यामुळे सर्व समाजबांधवांनी रमेश (दादा) आजबे यांना धन्यवाद दिले आहेत. आभार मानले आहेत.









