Saturday, October 3, 2026
Home ताज्या बातम्या दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह, मोहरीत खळबळ! खर्डा पोलिसांकडून चौकशी,...

दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह, मोहरीत खळबळ! खर्डा पोलिसांकडून चौकशी, आकस्मिक मृत्यूची नोंद

0
2
दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह, मोहरीत खळबळ!  खर्डा पोलिसांकडून चौकशी, आकस्मिक मृत्यूची नोंद

जामखेड न्युज – – – – – 

दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह, मोहरीत खळबळ!

खर्डा पोलिसांकडून चौकशी, आकस्मिक मृत्यूची नोंद

 

जामखेड तालुक्यातील मोहरी येथील ३० वर्षीय महिला ३० सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना गुरुवारी (दि. २) सकाळी उघडकीस आली. प्रतिभा अर्जुन कांबळे (वय ३०, रा. मोहरी) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेने मोहरी परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा कांबळे या ३० सप्टेंबर २०२६ रोजी घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मोहरी शिवारातील संभाजी महादेव हाके यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.


मृतदेह विहिरीत असल्याचे निदर्शनास येताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर प्रतिभा कांबळे यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मृत महिलेचे पती अर्जुन छगन कांबळे (वय २४, रा. मोहरी) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक २१/२०२६ अशी नोंद केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार क्षिरसागर पुढील तपास करीत आहेत. प्रतिभा कांबळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्या विहिरीपर्यंत कशा पोहोचल्या आणि या घटनेमागील परिस्थिती काय होती, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोलिस तपास आणि वैद्यकीय प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!