एकना एक दिवस रासपाचा पंतप्रधान चौंडीला येईल – महादेव जानकर

0
136

जामखेड न्युज——

एकना एक दिवस रासपाचा पंतप्रधान चौंडीला येईल – महादेव जानकर

एक दिवस रासपाचा पंतप्रधान चोंडीला येईल. आ. महादेव जानकर, जनसंवाद यात्रेचे जामखेड येथे भव्य स्वागत

माझ्या कार्याला चोंडीतून सूरूवात केली. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त लाखोंच्या सभा घेतल्या. पुढे मुंबईला जयंती साजरी केली. आता दिल्लीत जयंती साजरी करू लागलो आहे. दिल्लीत १० लाख लोक गोळा करणार असल्याचे सांगतानाच, एक दिवस रासपाचा पंतप्रधान चोंडीला येणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आ. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचे जामखेड येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आ. जानकर बोलत होते. यावेळी रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, प्रदेश सचिव रविन्द्र कोठारी, भानुदास हाके, जिल्हाध्यक्ष शहाजीराजे कोरडकर, युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर खरात, संपर्कप्रमुख हनुमंत निकम महाराज यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. जानकर म्हणाले, प्रादेशिक पक्ष जेवढे चांगले काम करतात. तेवढे मोठे पक्ष काम करत नाहीत. दिल्ली, तेलंगणा राज्यात शेतकरी व जनतेला अनेक सोयीसुविधा मिळतात. मात्र येथे शेतक-यांची पोर आम्ही मंत्री असूनही, काही देवु शकत नाहीत. म्हणजे आमचे हात बांधले आहेत. प्रादेशिक पक्षाला ग्रामीण जनतेचे प्रश्र माहित असतात. मोठ्या पक्षांना असे काही माहिती नसते. ते न्याय देवु शकत नाहीत. प्रादेशिक पक्षांची सत्ता आल्यानंतर विकास होवु शकतो. राज्यात सर्व साधनसंपत्ती असताना दिवसाला तीन शेतक-यांच्या आत्महत्या होतात. ही बाब आपल्यासाठी लाजिरवाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस असेल किंवा भाजपा पासून सावध व्हा आणि प्रादेशिक पक्षाला आपलेसे करा. अशी विनंती जनतेला करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढली असल्याचे आ. आमदार महादेव जानकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, भाजपा ,काँग्रेसला शिव्या देण्याऐवजी आम्ही स्वतंत्र ताकदीने तयारीला लागलो आहोत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जात आहोत. सर्व पक्षाचे लोक सहकार्य करत आहेत. जनतेला आता बदल पाहिजे. राज्यातील ४८ आणि उत्तरप्रदेशातील काही जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट
धनगर आरक्षणप्रश्री आ. जानकर म्हणाले, आदिवासी आयोगाचा धनगर आरक्षणाला विरोध असल्याचे आहे. काँग्रेस,भाजपातील आदिवासी समाजाचे खासदार, आमदार धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत मात्र भविष्यात रासपाचे १०० खासदार निवडून गेल्यास धनगर आरक्षणाबरोबरच मराठा, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्र सोडवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here