जामखेड न्युज——
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी स्वखर्चातून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला केली सुरूवात!!
जामखेड शहरातील बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काॅक्रेटीकरण करताना काढण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लाॅकमुळे या परिसरात विविध कामांसाठी येणारे नागरिक व तेथील व्यवसाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाण्याचे डबके साचून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. हीच अडचण ओळखून जामखेड नगरपरिषदेचे कार्यतत्पर नगरसेवक अमित चिंतामणी यांनी पुन्हा हे ब्लाॅक बसवून देण्याच्या कामाला प्रत्यक्ष उपस्थित राहुन व स्वखर्चाने या कामाला सुरुवात केली आहे.
जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये येणाऱ्या जामखेड शहरातील बीड रोड काॅर्नर ते पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काँक्रेटीकरण करण्यापुर्वी अमित चिंतामणी यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल नऊ लाख रूपये निधी खर्च करून या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचे दर्जेदार असे काम केले होते. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व इतर कार्यालयाकडे जाणारा रस्ता असल्याने याठिकाणाहुन जाणारे जामखेडकर या रस्त्याबाबत नेहमीच चर्चा करत होते मात्र बीड रोड ते नवीन पोलीस स्टेशनच्या रस्त्याचे काम करताना हे पेव्हिंग ब्लॉक पुर्णपणे काढण्यात आल्याने तेथील व्यवसाईक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या अडचणींचा विचार व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आज दि. २१ जुलै रोजी पुन्हा याठिकाणी व स्वखर्चाने पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अमित चिंतामणी हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित होते.
चौकट
जामखेड शहरातील सर्वात दर्जेदार कामे असणारा प्रभाग म्हणून अमित चिंतामणी यांचा प्रभाग तेरा ओळखला जातो. नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासन व नागरिकांची मागणी यानुसार प्रभागातील १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. नागरिकांची गैरसोय होत असल्याने हे काम मी स्वखर्चाने करून देत आहे.
अमित चिंतामणी, जामखेड