Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या बँड टच गुड टच बाबत विद्यार्थ्यांनी सजग रहावे पोलीस निरीक्षक महेश पाटील...

बँड टच गुड टच बाबत विद्यार्थ्यांनी सजग रहावे पोलीस निरीक्षक महेश पाटील पत्रकार सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्य वाटप

0
243

जामखेड न्युज——

बँड टच गुड टच बाबत विद्यार्थ्यांनी सजग रहावे पोलीस निरीक्षक महेश पाटील

पत्रकार सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्य वाटप

 

शाळांमधील मुला-मुलींमध्ये कार्यक्रम व उपक्रमांद्वारे चांगला स्पर्श किंवा वाइट स्पर्शाविषयी (गुड टच, बॅड टच) जागृती करावी, त्याचबरोबर मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा, स्वतःच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी यादृष्टीने विविध उपक्रम राबवावेत असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले. 

श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षण तसेच जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थी तसेच माता पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, ज्ञानदेव मुरूमकर, केंद्रप्रमुख किसनराव वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, पोलीस हेडकाँन्टेबल पालवे, पोलीस पाटील महादेव वराट, जामखेड मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव पप्पू सय्यद, पत्रकार अविनाश बोधले, किरण रेडे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, राम जावळे, भाऊसाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश पाटील यांनी सांगितले की,
मुला-मुलींसाठी चांगला स्पर्श-वाईट स्पर्शाविषयी जागृती करावी. शारिरीक, मानसिक पीडा, लैंगिक शौषण यासारखे प्रसंग मुला-मुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता याबाबत शिक्षक, पालक, मित्र-मैत्रिणी यांना सांगावे तसेच सुदाम वराट सरांचा आदर्श घेऊन समाजात आदर्श व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवावा स्वत:साठी काम करतात ते स्वतःपुरते राहतात मात्र समाज्यासाठी काम करतात त्यांची नावे अमर रहातात. हेच सामाजिक काम पत्रकार सुदाम वराट सर यांनी केले आहेत.

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आभ्यास व्यायाम व शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पालकांचे व शिक्षकांचे अनुकरण केले पाहिजे. जीवनात ज्यांना यश मिळाले आहे त्यांनी शिस्त व वेळेचे पालन केले आहे. तेच पालन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. भविष्यात चांगले अधिकारी बनायचे आसेल तर विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप च्या पुस्तकांचा आभ्यास केला पाहिजे.

कार्यक्रमाच्या शेवटी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा मुलांना शालेय गणवेश तर बारा मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील सर्व मुलांना जेवन देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी प्रस्तावित केले तर डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, ज्ञानदेव मुरूमकर यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!