सामान्यांच्या जीवनाला नवी दृष्टी देणार डॉ. मिसबाह शेख – श्रीकांत होशिंग
जामखेडमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवेची सुविधा उपलब्ध
जामखेड शहरात आधुनिक नेत्रसेवेची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मिसबाह शेख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या क्लिनिकमुळे जामखेड व परिसरातील नागरिकांना दर्जेदार नेत्रोपचार आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण आणि आरोग्य ही समाजाच्या प्रगतीची दोन महत्त्वाची आधारस्तंभ असल्याचे सांगितले. “दृष्टी स्पष्ट असेल तर शिक्षणाची वाट अधिक सुकर होते. शिक्षणाबरोबरच आरोग्यसेवेतही ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असे त्यांनी नमूद केले.
होशिंग यांनी डॉ. मिसबाह शेख यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत त्यांच्या पालकांनी दिलेले संस्कार, मेहनत आणि समाजसेवेची भावना यांचा विशेष उल्लेख केला. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी आपल्या गावात आधुनिक वैद्यकीय सेवा सुरू करणे ही समाजाप्रती असलेली बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उद्योजक रमेश गुळवे यांनीही मनोगत व्यक्त करत, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जामखेडच्या आरोग्य क्षेत्रासाठी हे क्लिनिक निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या हस्ते क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उच्च शिक्षितांनी आपल्या गावासाठी सेवा देणे कौतुकास्पद :- रमेशभाऊ गुगळे
व्हिजन प्लस आय क्लिनिक चे उत्साहात शुभारंभ
जामखेड प्रतिनिधी
उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाऊन तिकडेच मोठी नोकरी मोठा उद्योग करतांना तरूण लोक दिसतात .मात्र आपल्या गावाचे आपल्या लोकांचे आपण काही देणे लागतो या सामाजिक जाणीवेतुन उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ मिसबा यांनी जामखेड मध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे ठरविले हे कौतुकास्पद आहे .
डाॅ मिसबा यांचे आई वडील या दोघांच्याही कुटुंबाचे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे .उच्च शिक्षित डॉ मिसबा यांच्या सेवेतून जामखेडचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावर जाईल असा विश्वास एच.यु गुगळे उद्योगसमूहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी व्यक्त केला .डॉ मिसबा शेख यांच्या व्हिजन प्लस आय क्लिनिक या दवाखान्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत जामखेड येथे उत्साहात पार पडला यावेळी रमेशभाऊ गुगळे बोलत होते . सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय क्षेत्रात काम करत “गरिबांचा डॉक्टर” अशी भावना लोकांच्या मनात निर्माण केलेले जामखेडचे डॉ फारूख शेख यांच्या डॉ मिसबा शेख या कन्या आहेत. या
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत होशिंग सर ,उद्घाटक प्राचार्य बाळासाहेब पारखे जानमोहंमद पठाण , मुमताज पठाण व नरेंद्र ढाळे होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून एच यु गुगळे उद्योग समूहाचे रमेशभाऊ गुगळे ,मुस्लिम पंच कमिटीचे अझहरभाई काझी ,वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक अँड अरूण जाधव होते. यावेळी नगरसेवक वसीम सय्यद ,माजी नगरसेवक शामीरभाई सय्यद,मुक्तार टेलर, हाजी जावेद बारूद, राजूखान, हाजी नादीरभाई, आयुब पठाण सर, युसुफ शेख सर, ॲड. अल्ताफ शेख, इंजि. उमर शेख, डॉ. अल्ताफ शेख,वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. संजय राऊत, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. काकडे, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. पांडुरंग सानप, डॉ. सरफराज खान डॉ. भरत देवकर, डॉ. निखील वारे, डॉ. सागर शिंदे, डॉ. कामरान अत्तार, डॉ. चन्द्रकिरण भोसले, व्यवसायीक पितळे, वैभव आंबीलवादे, गादीया, सिंघवी , पै. राजूशेख, लॅब संघटनेचे कोल्हे, महेश यादव, रऊफ सय्यद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. यावेळी अँड अरूण जाधव ,श्रीकांत होशिंग सर आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या .यावेळी सुत्रसंचलन उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी तर आभार डॉ. सादेख पठाण यांनी मानले .