Friday, July 17, 2026
Home ताज्या बातम्या तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेसाठी सुरक्षित रस्ता व मूलभूत सुविधा द्या अन्यथा वंचित...

तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेसाठी सुरक्षित रस्ता व मूलभूत सुविधा द्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा – ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

0
6

जामखेड न्युज – – – – – 

तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेसाठी सुरक्षित रस्ता व मूलभूत सुविधा द्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा – ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव


तपनेश्वर येथील नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता व आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा जागरण-गोंधळ धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे.

यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक, ऊसतोड व विटभट्टी कामगारांच्या तसेच इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील १४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळाच शिक्षणाचा प्रमुख आधार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी रस्ता नसल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

याशिवाय शाळेला संरक्षण भिंत, सुरक्षित प्रवेशद्वार, आवश्यक कर्मचारी तसेच इतर मूलभूत सुविधांचाही अभाव आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरात भटकी जनावरे तसेच साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

त्यामुळे तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सुरक्षित रस्ता तात्काळ तयार करून सर्व प्रलंबित मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी केली. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी नगरसेविका संगीता भालेराव, मच्छिंद्र जाधव, बापूसाहेब ओहोळ, रजनी बागवान, सागर कांबळे, सुमित भालेराव, ऋषिकेश गायकवाड, सचिन भिंगारदिवे, नितीन जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!