श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पायी दिंडीचे परशुराम प्रतिष्ठानतर्फे उत्साहात स्वागत
श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पायी दिंडीचे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजता जामखेड शहरातील सिद्धिविनायक चौक, तपनेश्वर रोड येथे आगमन झाले. यावेळी परंपरेप्रमाणे परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात दिंडीचे आगमन होताच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तसेच सर्व वारकऱ्यांना प्रसाद म्हणून राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले. यामुळे वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त करत प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी परशुराम प्रतिष्ठानचे सचिन देशमुख, प्रमोद दाणी, विजय कुलकर्णी, सुहास देशमुख, आकाश कुलकर्णी, चैतन्य पावशे, राघवेंद्र कुलकर्णी, कदम साहेब, दादा महाडीक, मंगेश पवार, विकास नाईक आदी उपस्थित होते. तसेच महिला वर्गामध्ये योगिता देशमुख, अश्विनी कुलकर्णी, शोभा वाघ, सुषमा देशमुख, पूजा कुलकर्णी आणि सुलभा महामुनी यांनीही स्वागत व प्रसाद वितरणासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
परशुराम प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पायी दिंडीचे स्वागत करून वारकऱ्यांची सेवा केली जाते. यंदाही हा उपक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला.