पांडुरंगाच्या पादुका आषाढी वैद्य कामिका एकादशीला कर्जत येथे पुजनासाठी आणाव्यात – आमदार राम शिंदे

0
192

जामखेड न्युज——

पांडुरंगाच्या पादुका आषाढी वैद्य कामिका एकादशीला कर्जत येथे पुजनासाठी आणाव्यात – आमदार राम शिंदे

कर्जत जामखेड मतदारसंघातील कर्जत शहराचे ग्रामदेवत निस्सीम विठ्ठल भक्त संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळी प्रतिवार्षिक आषाढी वैद्य कामिका एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाच्या पादुका आणाव्यात अशी मागणी जामखेडचे सुपुत्र आमदार प्रा. राम शिंदे शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीकडे केली आहे.

याबाबत काल दि. ८ जुलै विठ्ठल रोजी रुक्मिणी देवस्थान समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी बालाजी पुदलवाड यांची भेट घेवून लोकभावना व श्रद्धा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून सादर केलेल्या या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा उपक्रम राबवल्यास या विठ्ठल भक्त संताचा नक्कीच सन्मान होईल.

तरी संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळी (कर्जत ता. कर्जत) प्रतिवार्षिक पंढरीच्या पांडुरंगाच्या पादुका आषाढी वैद्य कामिका एकादशीला आणण्यासाठी सहकार्य कराल अशीही अपेक्षा आमदार प्रा. राम शिंदे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

कर्जत येथील संत श्री गोदड महाराजांचे संजीवनी समाधी स्थान महत्व असल्याने सर्व भाविकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी व या रथयात्रेचं धार्मिक महात्म्य वाढण्यासाठी माजी मंत्री आ.राम शिंदे साहेब यांनी आज (8 जुलै) पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडे पंढरीच्या पांडुरंगाच्या पादुका कर्जत येथील कामीका एकादशीला भरणाऱ्या राथयात्रे निमित्त आणण्यात याव्यात अशी भक्तांच्या वतीने मागणी विनंती पत्राद्वारे केली आहे.

आ.राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघात दोन वेळी भाजप कडून विधानसभेत निवडून गेले आहेत. 2014 च्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. सध्या ते भाजप कडून विधानपरिषद सदस्य आहेत. आ. शिंदे यांनी केलेल्या मागणी देवस्थान समितीने मान्य करावी अशी इच्छा जिल्हा भाजपचे सरचिटणीस सचिन पोटरे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here