जामखेड न्युज——
जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दहा किलो गांजा जप्त करत एका गांजा तस्करास केले अटक

जामखेड पोलीसांनी अवैध धंद्यांविरोधात पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम उघडली आहे. यानुसार रात्रीच्या पेट्रोलिंग वेळी संशयास्पद व्यक्ती दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता दहा किलो गांजा आढळून आला यामुळे त्यास अटक करण्यात आली आहे. यामुळे जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे.

जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनने मोठी मोहीम हाती घेतली असून. त्याच अनुषंगाने रात्रीची पेट्रोलिंगही कडक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात चालणारे अनेक कारनामे उघड होऊन गुन्हेगारांवर जरब बसवण्यात जामखेड पोलीसांना यश येत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर काल दि. ८ जुलै रोजी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरात गांजा तस्करी करणाऱ्या आरोपी कडून १० किलो गांजा सह एक लाख साठ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोन अरोपी फरार झाले आहेत.

या बाबत सविस्तर काल दि. ८ जुलै रोजी सांयकाळी सहा वाजताचे सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल प्रविण पालवे, देवा पळसे हे पोलीस कर्मचारी जामखेड शहरात पेट्रोलिंग करत असताना जामखेडनगर रोडवरील कावेरी हॉटेल समोर आष्टीकडून जामखेडकडे मोटारसायकल सायकलवर ट्रिपल सिट असलेले मुले समोरून येताना दिसताच पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला.
गाडी थांबवताच मागे बसलेले दोघे पोलीसांना पाहून पळून गेले व मात्र गाडी चालवत असलेला संजय राजेंद्र पवार (वय २३) रा.जुने बसस्टँडचे पाठीमागे यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र सपोनि बडे यांनी बॅगची चैन उघडून पाहिले असता बॅगमध्ये विक्रीस प्रतिबंध असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आल्याने त्यांनी लगेच ही माहिती पोलीस महेश पाटील, तहसिलदार योगेश चंद्रे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे दिली व वजनकाटा धारक किराणा दुकानदार यास सदर माहीती देवून कारवाई करणेकामी हॉटेल कावेरी समोर बोलावून घेतले.
अधिक चौकशी करत आरोपी संजय राजेंद्र पवार याचेकडे विचारपूस केली असता हा गांजा आपण बबलू शंकर काळे रा.मिलींदनगर जामखेड (फरार) याचा असून बबलू काळे हा बाळू कांतीलाल काळे रा.खडकवाडी, (फरार) यास सोबत घेवून सदरचा माल कोणाला देणार होता हे मला माहीत नाही असे सांगितल्याने.
सदर घटनेतील मिळून आलेला प्रत्येकी २ किलो वजनाचे ५ पुडे असा एकूण १० किलो गांजा तहसिलदार व दोन शासकीय पंचासमोर यांचे समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. मिळून आलेला गांजा व मोटार सायकल असा एकुण एक लाख साठ हजार रूपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवून जामखेड पोस्टेला पुढील कारवाई करत असून पळून गेलेल्या आरोपीचा शोध जामखेड पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे सुनिल बड़े, पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल देवा पळसे, प्रविण पालवे, सचिन पिरगळ, गणेश भागडे, घोळवे, पाचपुते, देवडे, सुपेकर, यांनी सहकार्य केले. या घटनेमुळे जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे.





