जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘परिवर्तनाच्या वाटा’ या समूहातर्फे आयोजित ‘कोण होईल महाराष्ट्राचा बालवक्ता?’ या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथील इ.१ लीचा चि. आराध्य परशुराम नागरगोजे व कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथील इ.३ रीची कु.आर्या बाळासाहेब औटे या जामखेड तालुक्यातील दोन बालवक्त्यांचा विशेष उत्तेजनार्थ गौरव करण्यात आला.
आराध्यला आदर्श शिक्षक मनोहर इनामदार सर यांचे तर आर्याला श्रीमती शिवाली डुचे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
राज्यभरातून इ.१ ली ते १० वीच्या ग्रामीण व शहरी भागांतील सर्व माध्यमांच्या शाळांतून विविध गटांतून सुमारे ६०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर व पूर्वशिक्षण संचालक डाॅ.गोविंद नांदेडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अत्यंत कमी वयात राज्यपातळीवरील वक्तृत्त्व स्पर्धेत यश मिळविलेल्या आराध्य व आर्या यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.