जामखेड न्युज——
हभप श्रीधर महाराज वराट यांचे अल्पशा आजाराने निधन
साकत येथील श्रीधर महाराज वराट वय ६५ यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि. ८ रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ९.३० वाजता साकत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीधर महाराज हे अंध होते. तरीही त्यांचे अनेक अभंग तोंडपाठ होते. रामायण महाभारत याचा अर्थ सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. साकत येथील विठ्ठल मंदिरात असलेल्या अखंड विनावादन साठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे. आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठल मंदिरात विनावादन करण्यात व विठ्ठलाची सेवा करण्यात घालवले.
त्यांनी पूर्ण आयुष्य विठ्ठल सेवा करत अखंड विना वादनात मोलाचं योगदान दिलं दृष्टी नसूनही डोळसपणे अखंड सेवा केली ज्यांच्या मंत्रमुग्ध आवाजात सकाळ व संध्याकाळी काकडा आरती व हरिपाठ नित्यनेमाने होत असे.
आपल्या आवाजाने साकत परिसरातील वातावरण हे भक्तिमय ठेवणारे असे श्रीधर महाराज यांचं आज निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.