जामखेड न्युज ——
बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशन या मार्गाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग नामकरण

छत्रपती शिवाजी महाराज चौक (बीड कॉर्नर) ते मोरे वस्ती या रस्त्याचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग करण्यात आले आहे त्यामुळे परिसरातील शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

आज रविवार दि. २ जुलै रोजी अनेक दिवसांपासून सर्व शिवप्रेमींची मागणी होती कि छत्रपती शिवाजी महाराज चौक (बीड कॉर्नर) ते मोरे वस्ती या सदरील रोड ला अनेक नावांनी ओळखले जात होते जसे कि जुना शिऊर रोड, तहसील रोड, पोलिस स्टेशन रोड, आय. सी. आय. सी बँक रोड त्यामुळे या रोड ला विशिष्ट अशी एक ओळख नसल्याने जामखेड मध्ये शासकिय कामासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होत होती व या रोड ला सर्व समावेशक असे एकच नाव किंवा ओळख असावी अशी सर्व शिवप्रेमींची मागणी होती व त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक (बीड कॉर्नर) ते पोलीस स्टेशन या मार्गाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग जामखेड मधील समस्त शिवभक्तांच्या मागणीनुसार आज करण्यात आले.

सुरुवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक शाहूराव बाबुराव राळेभात व आप्पासाहेब घोलप यांच्या हस्ते मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड या संकल्पनेनुसार अतीशय सुंदर असा नामकरणाचा फलक लाऊन या मार्गाचे सुशोभीकरण देखील होत आहे व रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या मार्गाला दिल्याने सदरील मार्गाची विशेष अशी ओळख निर्माण होईल. या वेळी सर्व शिवभक्त, धारकरी, व श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन झाल्यानंतर शेवटी शिवरायांचे आठवावे रुप व प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुरंग भोसले जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की या रोडला अनेक नावाने ओळखले जात होते परंतु जामखेडच्या सर्व शिवभक्तांच्या मागणीनुसार या रोडचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे करण्यात आलेले आहे.
यावेळी जेष्ठ नागरिक आप्पासाहेब घोलप व शाहूराव बाबुराव राळेभात यांनी या रोडचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज केल्यामुळे आनंद वाटला आणि हा उपक्रम चांगला आहे असे उपक्रम यापुढे घ्यावेत आम्ही सर्व तरुणांच्या मागे आहोत असे मनोगत व्यक्त केले.





