Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शब्द, आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शब्द, आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

0
285

जामखेड न्युज——

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शब्द, आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी देण्यासाठी सध्याचे सरकार वारंवार पाठपुरावा करूनही व आमदार रोहित पवार यांनी स्मरणपत्र देऊनही टाळाटाळ करत होते म्हणून आमदार रोहित पवार यांच्या सह कर्जत जामखेड तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांसह उद्या पासून मुंबईत उपोषण करणार होते. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीला मंजुरी देतो म्हणून सांगितले म्हणून उदयाचे उपोषण मागे घेण्यात आले आहे.


कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांना महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी शब्द दिला आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तुमची हक्काच्या MIDC ला मंजुरी देतो म्हणून उद्या होणारे उपोषण मागे घेण्यात आले आहे याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी असा मेसेज सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे यांनी पाठवला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी देण्यासाठी सध्याचे सरकार वारंवार पाठपुरावा करूनही व आमदार रोहित पवार यांनी स्मरणपत्र देऊनही टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि युवा वर्ग थेट मंत्रालयात गेल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रालयात कर्जत जामखेडच्या युवा व नागरिकांनी उद्योग व खनिकर्म प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे व मंत्रालय मुख्य सुरक्षा अधिकारी पोलिस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची भेट घेऊन त्यांना एमआयडीसीबाबतच्या उपोषणाचे पत्र दिले होते.

मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन सर्वात उच्च असलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली होती. एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी याबाबत वेळोवेळी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला आहे. त्यावर मंत्री महोदयांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केलं. परंतु, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता म्हणून उपोषण करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी दोघांकडेही मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दिनांक 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत जामखेडमधील जनतेवर राजकिय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर 26 जून 2023 पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते. पण आता परत पावसाळी अधिवेशनात मंजुरी देऊ म्हणून सांगितले आहे त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!