प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ जामखेड च्या वतीने आरोळे कोविड सेंटरला एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

0
166
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
          कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत हजारो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. आतापर्यंत आरोळे कोविड सेंटरने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे परिसरातील दानशूर व्यक्तींनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर  रोख रक्कम, अन्नधान्य, भाजीपाला स्वरूपात मदत केली आहे. यामध्ये शिक्षक संघटना आघाडीवर आहेत. सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ व महिला आघाडीच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला एक लाख अकरा हजार रुपयांची मदत केली.
     आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकांनी ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश  सपकाळे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते  रमेशदादा आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, शरद कार्ले, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, सदिच्छा मंडळाचे नेते केशवराज कोल्हे, रजनीकांत साखरे, सरचिटणीस नितीन मोहोळकर, केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर, सीताराम निगुडे, मनोजकुमार कांबळे, उपेंद्र आढाव, किरणकुमार माने, विजयकुमार जेधे, बगाडे सर, मनोहर इनामदार आदी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
       प्रत्येक सामाजिक कार्यात सदिच्छा मंडळ नेहमी अग्रेसर असते. यापूर्वी सुद्धा कोल्हापूर मध्ये आलेला महापूर,भूतवडा तलावातील गाळ काढणे यासाठी निधी, करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी गोरगरीब कुटुंबाला किराणा किट, तसेच भरीव आर्थिक मदत अशा आपत्तीच्या काळात सामाजिक कार्य म्हणून सदिच्छा मंडळ नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.
     पुन्हा एकदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उत्तरदायित्वांच्या भावनेतून सदिच्छा मंडळाने केलेली ही मदत प्रेरणादायी आहे. या निधी संकलन कामी महिला आघाडीच्या अध्यक्षा कामिनी राजगुरू व जिल्हा सरचिटणीस अर्चना भोसले  यांनी विशेष मेहनत केली.
                       
    आपत्तीच्या वेळी शिक्षक मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात आपले सामाजिक दातृत्व दाखवून मदतीसाठी पुढे येतात. अडचणीच्या काळात आरोळे कोविड सेंटरला शिक्षक संघटना सदिच्छा मंडळाने आर्थिक मदत केली आहे. या मदती बदल डॉ. रवी आरोळे यांनी शिक्षकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here