शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार  जामखेड परिसरात एकच खळबळ गुन्हा दाखल होताच जामखेड पोलीसांनी आरोपीस केली अटक

0
385

जामखेड न्युज——

शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

जामखेड परिसरात एकच खळबळ

गुन्हा दाखल होताच जामखेड पोलीसांनी आरोपीस केली अटक

शाळेतील अभ्यासाच्या माध्यमातून स्नॅपचॅट अँपचे माध्यमातुन जवळीक साधुन अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवुन शेजारी आष्टी येथील एका लाँजवर नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. 

 

 शिक्षक आरोपी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे रा. साकत ता. जामखेड यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला कलम ३७६ (२) एफ (आय) भादवी सह कलम ४ बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील बालकास शिक्षक आरोपीने शाळेच्या अभ्यासाचे माध्यमातुन तिचेशी स्नॅपचॅट अँपचे माध्यमातुन जवळीक साधुन बालकास अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवुन दि.१४/६/२०२३ रोजी दुपारी १४/०० वा.चे.सुमारास बालकास जामखेड येथुन हर्षद लाँज, आष्टी ता.आष्टी, जि.बीड येथे घेवुन जावुन पिडीत बालक हे अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिचेशी बळजबळीने शारीरीक सबंध केले व त्याबाबत कोणाला काही सांगितले तर तिचे अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. वगैरे फिर्याद वरुन गुन्हा

दाखल होवून तपास चालु आहे.

 

सदर गुन्हयाच्या तपासात बालकाची ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे जबरी संभोग या

सदराखाली वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नमुद आरोपीचा शोध घेता तो

 मिळुन आल्याने तसेच सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करुन मा.सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करुन त्यास आज

दि.२१/६/२०२३ रोजी ११/५४ वा. अटक करण्यात आली आहे

 

  गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, एपीआय सुनील बडे पोलीस हेडकाँन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काँन्टेबल देवा पळसे, सचिन पिरगळ, प्रकाश जाधव, प्रविण पालवे यांच्या पथकाने ताबडतोब आरोपीस अटक केली. 

 

आरोपीस श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here