Saturday, March 14, 2026
Home ताज्या बातम्या जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत पहा कोणते कृषी सेवा...

जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत पहा कोणते कृषी सेवा केंद्र आहेत

0
299

जामखेड न्युज——

जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत
पहा कोणते कृषी सेवा केंद्र आहेत

कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीही कार्यरत आहे.

शेतक-यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणा-या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ठरवून दिलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करणे कृषी सेवा केंद्राच्या चालकांना चांगलेच भोवले आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांना याप्रकरणी जिल्‍ह्यातील सहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये ४ बियाणे विक्री केंद्र तर २ कीटकनाशके विक्री केंद्रांचा समावेश आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु झाला आहे. समाधानकारक पाऊस झाला असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकरी अद्यापही उत्सुक दिसत नाही. मात्र काही शेतकरी धूळपेर करतात. यासाठी बाजारामध्ये बि-बियाणे, खते व इतर कृषि साहित्य खरेदी करत आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे.

शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. जिल्हाभर भरारी पथक कार्यरत आहे. निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्रांचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आली आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये. शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दरातच विक्री करावा. अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.- सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी कारवाई केलेल्या कृषी सेवा केंद्रांची नावे
नेवासा तालुका
१) संजीवन कृषी सेवा केंद्र, करजगाव.
२) सद्गुरू कृषी सेवा केंद्र सोनई.
३)जगदंबा कृषी सेवा केंद्र, घोडेगाव.
४)बळीराजा ऍग्रो सर्व्हिसेस कौटा.राहुरी तालुका

दोन किटकनाशके केंद्रे
१)किसान कृषी सेवा केंद्र वळण ,नगर तालुका
२) अक्षमला सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, अहमदनगर.

या सहा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!