बारामतीला रेमडेसीवीर इंजेक्शन मिळतात जामखेडला का नाही मिळत – माजी मंत्री प्रा. राम शिंदे

0
204
जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

      कोरोना आजारावर उपयोगी ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शन बारामती मध्ये मिळतात पण जामखेडला मिळत नाहीत. जिल्ह्यात कुठेही आॅक्सिजनचा तुटवडा नाही फक्त जामखेड मध्ये तुटवडा आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीन वेळा आॅक्सिजन पुरवठा खंडित झाला होता यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला हे शासन व प्रशासनाच्या समन्वयाअभावी घडले आहे. तसेच सध्या गावा गावात वाडी वस्तीवर अनेक मृत्यू होत आहेत पण प्रशासनाकडून आकडे लपवले जात आहेत. असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
       
       माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज जामखेड शहरातील नऊ खाजगी कोविड सेंटरला भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली व येथील आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टिका केली ते म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धी मिळवावी पण स्वतः अर्थसाहाय्य खर्च करून प्रसिद्धी मिळवावी सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. या आजारावर लवकरात लवकर उपचार घेतल्यावर आजारातून आपण लवकर बरे होतोत त्यामुळे अंगावर दुखणे काढू नका तसेच जामखेड मध्ये जसे आरोळे कोविड सेंटर आहे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रूग्ण आहेत. प्रशासनाने येथील भार कमी करण्यासाठी तालुक्यातील खर्डा, अरणगाव व नान्नज येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करून तेथील रूग्णांवर तेथेच उपचार करावेत. तसेच खासगी कोविड सेंटरला भेट दिल्यावर येथिल डॉक्टरांच्या मते बेड शिल्लक आहेत पण प्रशासनाकडून आॅक्सिजन पुरवठा होत नाही. येथील अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे उपचार करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे खाजगी कोविड सेंटरच्या सर्व अडचणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात येतील.
                   
         सध्या कोरोना महामारीने अनेक मृत्यू होत आहेत प्रशासनाकडून आकडे लपवले जात आहेत. खरे आकडे बाहेर येत नाहीत. सध्या हि वेळ राजकारण करण्याची नाही
आम्ही सर्व आपल्या बरोबर काम करू सध्या प्रशासन नागरिक व लोकप्रतिनिधी एकत्रित पणे समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करत कोरोनाला लवकरात लवकर पळवून लावू असे शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here