जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या व देशाच्या विविध भागात आपले कर्तव्य बजावत असलेल्या साकत मधील सैनिकांनी कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटरला अडोतीस हजार रुपयांची मदत केली आहे. यामुळे देशसेवे बरोबरच सामाजिक भान जपले आहे यामुळे या सैनिकांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरचे काम संपुर्ण देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचले आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात आपले कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांनी आरोळे कोविड सेंटरला अडोतीस हजार रुपयांची मदत केली आहे. हि मदत फौजी ज्ञानेश्वर मुरुमकर यांच्या हस्ते आरोळे कोविड सेंटरचे असिफ पठाण व सुलताना (भाभी) शेख यांच्या कडे जमा केली यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदिप आजबे, संदिप राऊत, भगवान पालवे, विजय कोळी, पत्रकार सुदाम वराट उपस्थित होते.
देशाच्या वेगवेगळ्या भागात देशसेवा करणार्या साकत मधील सैनिकांनी सामाजिक भान राखत सुट्टीवर असणारे फौजी ज्ञानेश्वर मुरुमकर यांच्याकडे आॅनलाईन पाठवली आज ही रक्कम आरोळे कोविड सेंटरला दिली साकत मधील सामाजिक भान ठेवणारे सैनिक पुढीलप्रमाणे आहेत ज्ञानेश्वर मुरुमकर, पोपट अडसुळ, शिवाजी घोडेस्वार, हरी वराट, महेश देशमुख, राहुल जावळे, गोरख लहाने, ईश्वर मोरे, प्रशांत मोरे, महेंद्र नेमाने, नितीन सरोदे, आकाश वराट, गणेश वराट, ईश्वर वराट, प्रविण प्रल्हाद वराट, प्रविण संभाजी वराट, राम वराट, विठ्ठल वराट, भरत वराट अशा फौजींनी आरोळे कोविड सेंटरला अडोतीस हजार रुपयांची मदत केली आहे.

देशाच्या संरक्षणाबरोरच सामाजिक भान राखत आरोळे कोविड सेंटरला मदत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सैनिकांचे विशेष कौतुक केले व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आरोळे कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले. आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना भाभी व असिफ पठाण यांनी सर्व फौजींचे आरोळे कोविड सेंटरच्या वतीने आभार मानले.