जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत हजारो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. आरोळे कोविड सेंटरला परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरखेड हसनाबाद ग्रामस्थांतर्फे आज आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस हजार रुपये, पंचवीस कट्टे अन्नधान्य, अकरा तेल डबे, भाजीपाला व दुध देण्यात आले.
आज दिनांक 11 वार मंगळवार रोजी समाजभूषण डॉक्टर रविदादा आरोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मंगेश (दादा) आजबे यांच्या प्रेरणेने व जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते पिंपरखेड हसणाबाद येथील नागरिकांनी जमा केलेले 11 तेल डबे, 25 कट्टे ( गहू,तांदूळ,ज्वारी, बाजरी),50 लिटर दूध, 5 तेल पिशव्या,4 कट्टे वांगे आणि रोख रक्कम 21000 रुपये ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड येथील सुलतान शेख मॅडम यांच्याकडे सुपूर्त केली.
हाळगाव, पिंपरखेड हसनाबाद या परिसरामध्ये कोरोणा विषाणूचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने पिंपरखेड येथील राहुल पवार, संजय ढोले व बंडू सातपुते या तरुणांनी संकल्प करून दिनांक 8, 9 व 10 मे 2021 या कालावधीमध्ये आदरणीय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम हाती घेतली व त्यास ग्रामपंचायत सदस्य, युवकांनी व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जनजागृती करत असताना नागरिकांनी वरील प्रकारची मदत डॉक्टर रविदादा आरोळे यांच्या हॉस्पिटलसाठी दिली. डॉक्टर रविदादा आरोळे हे समाजसेवेच्या भावनेने कोरोणा रुग्णांची सेवा निशुल्क करत असून त्यांना छोटासा हातभार लावण्यासाठी जामखेड व परिसरातील समाजसेवक पुढे येत आहेत. आज समाजभूषण डॉक्टर रवी दादा आरोळे यांचा वाढदिवस असून त्याच वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरखेड हसणाबाद परिसरातील नागरिकांनी जमा केलेली मदत आरोळे हॉस्पिटलच्या सुलताना (भाभी) शेख यांच्याकडे सुपूर्त केली.

त्याप्रसंगी उपस्थित जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, स्वाभिमानी शेतकरी पक्ष युवक अध्यक्ष राहुल पवार, पिंपरखेड ग्रामपंचायत सदस्य अरुण गाडेकर, पिंपरखेड शुभम भापकर, संजय ढोले, बंडू सातपुते, बापू शिंदे, महादेव मोरे, इम्रान शेख, केशवराज कोल्हे उपस्थित होते.