कोरोना लसीची आॅनलाईन नोंदणीची वेळ निश्चित करावी – नगरसेवक अमित चिंतामणी

0
187
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
   सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. लोक भयभीत झाले आहेत. लोक लसीकरणासाठी आठ दहा दिवसांपासून आॅनलाईन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण आॅनलाईन होत नाही. त्याची वेळही निश्चित नाही यामुळे लोकांचे खुपच हाल होत आहेत एका मिनिटात नोंदणी पुर्ण होते. तेव्हा आॅनलाईन नोंदणीची वेळ निश्चित करावी तसेच अनेक लोकांच्या दुसर्‍या लसीची मुदत संपली तरी लस मिळत नाही. अनेकांकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांनी नोंद कशी करायची याचा प्रशासनाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
     
        तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 18 ते 44 या वयोगटासाठी मागील तीन दिवसापासून वेगवेगळ्या वेळेत नोंदणी होत आहे दिनांक 7 मे 2021 रोजी सायंकाळी 6.00 ते 6:20  मिनिटापर्यंत नोंदणी वेळ होती  दिनांक 8 मे 2021 रोजी दुपारी 4:15 ते 4:30 अवघे 15 मी नोंदणी झाली दिनांक 9 मे 2021 रोजी दुपारी 4:00 ते 4:01 फक्त 1 मी नोंद झाली या तीनही वेगवेगळ्या वेळेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. संबंधित यंत्रणेशी आपल्या स्तरावर एकाच वेळेची  निश्चिती व्हावी , तसेच काही सामान्य नागरिकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने त्यांची नोंदणी त्यांनी कुठे करावी ही देखील समस्या येत आहे व जामखेड शहराची लोकसंख्या पन्नास हजारापेक्षा जास्त असल्याने शहरांसाठी उपलब्ध होणाऱ्या लसी पैकी किमान 80 टक्के लस ही शहरातील नागरिकांना देण्यात यावी वय वर्ष 45 पुढील नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी 15 दिवस अगोदर पासून दररोज ग्रामीण रुग्णालयात जाऊन दोन ते तीन तास प्रतीक्षा करून पुन्हा लस न घेताच घरी यावे लागत आहे, या सर्वांच्या ज्येष्ठता सर्वांच्या त्यांना होणाऱ्या किंवा त्यांना असणाऱ्या आजाराचा विचार करून त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना लसीकरण करावे ही नम्र विनंती.                    
जर एका मिनिटात साईट फुल होत असेल तर नोंदणी कशी होणार प्रशासनाने योग्य तो समन्वय करून नोंदणी वेळ निश्चित करावी तसेच अनेकांना लसीचा पहिला डोस घेऊन दोन महिने झाले तरी त्यांना लस मिळत नाही. तेव्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे जेणेकरून सर्वाना लस मिळेल.
    तहसिलदार यांना निवेदन देताना कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी, शिवकुमार डोंगरे, अतुल पवार, बब्बू पठाण, प्रशांत राऊत, नितीन जगताप हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here