जामखेड न्युज——
जामखेड सर्जिकल अँड अक्सीडेंट हॉस्पिटलमधील महिनाभर चाललेल्या शिबीरात शेकडो गोरगरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया
जामखेड सर्जिकल अँड अक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये तब्बल एक महिना आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात शेकडो गोरगरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याही अत्यंत माफक दरात.
महिनाभर चाललेल्या महाशिबीराची सांगता
१७८ रुग्णांवर झाल्या विविध शस्त्रक्रिया
जामखेड शहरात प्रथमच १ मे महाराष्ट्र दिनापासून जामखेड सर्जिकल व अक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये महिनाभर चालणारे महाशिबीर आयोजित करण्यात आले होते.
त्याची ३१ मे अहिल्यादेवी जयंतीदिनी सांगता झाल्याची माहिती हॉस्पिटल चे संचालक डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी दिली. या शिबिरामध्ये फक्त जामखेडच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातून सुद्धा आलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तसेच काही रुग्ण खास शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई पुणे औरंगाबाद बीड सोलापूर उस्मानाबाद इ. ठिकाणाहून सुद्धा आले होते. या शिबिरात १७८ रुग्णावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अपेंडिक्स हॅर्निया मूळव्याध भगंदर फिशर टॉन्सिल हाडाचे फ्रॅक्चर मूत्रमार्गाचे आजार गर्भपिशवीचे आजार विविध गाठी पित्ताशयाचे खडे असे विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान ह्यांच्या व्यतिरिक्त स्त्रीरोगतज्ञा डॉ. मंजुश्री टेकाडे (कडा) डॉ. हृषीकेश पंडित (अहमदनगर ) डॉ. अर्चना झगडे (जामखेड), पोटविकारतज्ञ डॉ. मुकेश राठोड (औरंगाबाद), मूत्रमार्ग तज्ञ डॉ. नीरज गांधी (अहमदनगर ), अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित बडवे (अहमदनगर ) कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. महावीर कटारिया (अहमदनगर) ह्यांनी सहभाग घेतला. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. अंकुश पवार, डॉ. शोएब शेख, डॉ. प्रिया टेकाडे ह्यांनी काम पाहिले. सह्याद्री लॅब चे श्री रौफ सय्यद , श्री. शिवाजी शेंडे, श्री. सुरज तोडकर ह्यांनी शिबीरात सक्रिय सहभाग नोंदविले.
शिबिरामध्ये विविधप्रकारच्या, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अल्पदरात झाल्याबद्दल डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान ह्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच दरवर्षी मे महिन्यात शिबीर घेण्याचा मानस त्यांनी ह्यावेळी बोलून दाखविला. शिबीर व्यवस्थित पार पडल्याबद्दल त्यांनी सर्व लोकांचे आभार मानले.