जामखेड न्यूज——
आजच्या दिवशी चौंडीत कोणीही राजकारण करू नये – नवनाथ पडळकर
चौंडीत आजच्या दिवशी मिळालेल्या उर्जेने वर्षभर प्रेरणा मिळते
उन्हा पावसाची तमा न करता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या पवित्र ठिकाणी येतात आणि उर्जा घेऊन जातात या उर्जेने वर्षभर प्रेरणा मिळते त्यामुळे आजच्या दिवशी चौंडीत कोणीही राजकारण करू नये असा इशारा नवनाथ पडळकर यांनी दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त जाहीर सभेत भाजपाचे प्रदेश सचिव तथा अहमदनगर शहर जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर बोलत होते. चौंडीत जयंती कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णा डांगे, आमदार बबनराव पाचपुते, प्रा. राम शिंदे, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, सुरेश धस, भिमराव धोंडे, गोपीचंद पडळकर यांच्या सह अनेक आमदार नेते व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मालिका दाखवली जात आहे पण यात गृहकलह जास्त दाखवला जातो. यात आदर्श राज्यकारभार दाखवणे आवश्यक आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजकार्याचा वसा चालवण्यासाठी सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी दहा हजार कोटी रुपये बीनव्याजी मिळणार आहेत. या शासनाच्या योजनेचा लाभ धनगर बांधवांनी घ्यावा रोज सत्तावीस कोटी रुपये वितरण होणार आहे. याचा लाभ मेंढपाळ युवकांनी घेत उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन केले.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, शस्त्र आणी शस्त्राद्वारे अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तावीस वर्षे राज्यकारभार केला हे कार्य खुप मोठे आहे. समाजातील उच्च शिक्षित लोकांनी तळागाळातील लोकांना शासनाच्या योजना कशा पोहचतील हे पाहावे.