जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोविड हॉस्पिटलमध्ये बीडला चाललेला टॅकर जामखेड शहराजवळ पहाटे नादुरुस्त होऊन बंद पडल्याने काय करावे या चिंतेत आसताना बीडला पोलीस स्टेशनला कळविण्यात आले तेव्हा बीड पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला तेव्हा पहाटे पाच वाजता कोठारी यांनी ताबडतोब फिटर पाठवला टॅकर दुरूस्त केला सर्वाची चहा नाष्टा सोय केली व वेळेवर टॅकर बीडला रवाना झाला यामुळे कोविड रूग्णांना वेळेवर आॅक्सिजन मिळाला यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी बीडच्या कोरोना रूग्णांसाठी देवदूत बनले.

सामान्य जनतेच्या पहिल्या हाकेला ओ देणारे संजय कोठारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाकेला सुद्धा सकारात्मक ओ दिला आणि भल्या पहाटे धडपड करुन राहुल राखेचा अभय बाफना, श्रेयास बाफना, अमृत मते, कदीर फिटर, पूर्ण स्पेअर पार्ट सहित पूर्ण यंत्रणा उभी केली. व टॅकर दुरूस्त केला
जामखेड मध्ये तर टँकर तर दुरुस्त केलेच पण पुढे गेल्यावर सौताड्याचा घाट चढल्यावर ही मशीनमध्ये बिघाड झाल्याने टँकर बंद पडले. तिथे ही पूर्ण यंत्रणा पोहचली व दुरुस्ती करून केली. उपाशी पोटी असलेल्या टँकर चालकास नाष्टा-पाणी करून बीडकडे रवाना केले.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपल्या समाजसेवेबद्दल परिसरात प्रसिद्ध आहेत. अपघात ग्रस्थांना अहोरात्र मदत करणे, आरोळे कोविड सेंटरला मदत करणे मास्क सॅनिटायझर वाटप करणे, आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना मदत करणे हे काम सतत चालू असते पहाटे पाच वाजता ऑक्सीजन टँकर चाकणहून बीडला जात असताना जामखेड जवळ नादुरुस्त झाला होता. लाॅकडाउन मुळे सगळे बंद आता काय करावे या विचारात सगळे होते टॅकर बरोबर नायब तहसीलदार, पोलीस गाडी होती त्यांनी बीड पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा बीड पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला कोठारी यांनी ताबडतोब फिटर मिळवून दिला सर्वाची चहा पाणी व नाष्टा सोय केली. यामुळे बीडच्या कोविड रूग्णांसाठी वेळेवर आॅक्सिजन टॅकर पोहचला याबद्दल बीडच्या प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे आभार मानले.