जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज- (सुदाम वराट)
सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. तालुक्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांना बेड, आॅक्सिजन व इंजेक्शन मिळत नाहीत. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी तालुक्यात स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे तसेच लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे नियोजन करावे अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी केले आहे.
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, लोकप्रतिनिधींना जनसेवा करण्याची हिच खरी वेळ आहे तेव्हा आमदार व खासदार यांनी तालुक्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे जेणे करून लोकांना उपचार घेता येतील. इतर तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींनी कोविड सेंटर सुरू केले आहेत. आपल्याही तालुक्यात ते सुरू करावेत. तालुक्यातील मंगल कार्यालये व इतर ठिकाणी कोविड सेंटर उभारावेत व लोकांना आधार देण्याचे काम करावे.

कोरोनाची लस घेण्यासाठी जामखेड केंद्रावर सध्या मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे यातुनच कोरोनाचा संसर्ग वाढण्यांची शक्यता आहे हे टाळण्यासाठी गाव पातळीवर आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे नियोजन करावे. सध्या लसीकरणासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांकडे अॅन्डराॅइड मोबाईल नाहीत मग त्यांनी नोंदणी कशी करावयाची यासाठी गाव पातळीवर लसीकरणाचे नियोजन करावे यामुळे शहर गर्द होहोणा नाही व ग्रामीण भागातील लोकांना लसही मिळेल अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी केली आहे.