पाच वर्षे बाजार समितीत त्यांची सत्ता होती ते मंत्री होते काय विकास केला – अमोल राळेभात आमचा पराभव बाजार बुनग्यांमुळे झाला आमदार रोहित पवारांच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न तसेच मतदरांचे आभार

0
230

जामखेड न्युज——

पाच वर्षे बाजार समितीत त्यांची सत्ता होती ते मंत्री होते काय विकास केला – अमोल राळेभात

आमचा पराभव बाजार बुनग्यांमुळे झाला

आमदार रोहित पवारांच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न तसेच मतदरांचे आभार

मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची सत्ता होती ते मंत्री होते त्यांनी काय विकास केला फक्त विरोधासाठी विरोध करण्यात वेळ घालवतात त्याच्या कडे विकासाचे कसलेही व्हिजन नाही. आमदार रोहित पवार यांच्या कडे व्हिजन आहे सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. त्यामुळे आता पुढे दादांचा शब्द आमच्या साठी अंतिम राहिल दादा हेच आमचे नेते आहेत असे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सांगितले.

 

आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखालील सरकार व शेतकरी विकास पॅनलच्या नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन व संचालकांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व हमाल यांचे आभार कार्यक्रम संपन्न झाला


यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती संजय वराट, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन कैलास वराट, संचालक सुधीर राळेभात, अंकुशराव ढवळे,
सतिश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय, सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, विश्वनाथ राऊत, अक्षय शिंदे, विजयसिंह गोलेकर, दादा उगले, काकासाहेब कोल्हे, बापू कार्ले, काका चव्हाण, शहादेव वराट, प्रा. महादेव डुचे, शरद शिंदे, विजय पवार, राजाभाऊ वराट, महादेव वराट, यांच्या सह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे चेअरमन, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की या निवडणुकीत आपले कोण परके कोण हे समजले आहे. काही जागेवर आमचा पराभव बाजार बुनग्यांमुळे झाला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे १३ संचालक होते यावेळी ९  झालेत पुढील वेळी शुन्य करू असा विश्वास व्यक्त केला.

तीन संचालकांवर खुपच दबाव आणला पण ते बळी पडले नाहीत. फुटले नाहीत आमदार राम शिंदे फक्त दबावाचे राजकारण करतात. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना कळेल आपण कुठे आहोत ते असे राळेभात यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here