जामखेड न्युज——
ध्येय व चिकाटी मुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येते – बाळासाहेब धनवे
जिव्हाळा शिक्षक मित्रांच्या वतीने जामखेडचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सन्मान.
जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून बाळासाहेब धनवे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. ते जामखेड तालुक्याचेच सुपुत्र आहेत जिव्हाळा शिक्षक मित्रांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
आज दि.28 एप्रिल रोजी जामखेड तालुक्यात नव्याने हजर झालेले मा. गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांचा येथील जिव्हाळा शिक्षक समुहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री.. धनवे साहेब म्हणाले ध्येय आणि चिकाटीने कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करता येते.
प्रसंगी उत्तम पवार ,जितेंद्र आढाव , उपेंद्र आढाव, विजय जाधव रजनीकांत साखरे विनोद सोनवणे गोकुळ गायकवाड अर्चना भोसले कांबळे मॅडम नगरसेविका विद्या वाव्हळ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.