प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदासजी फुटाणे यांचा जामखेड करांच्या वतीने ग्राम सत्कार

0
174

जामखेड न्युज——

प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदासजी फुटाणे यांचा जामखेड करांच्या वतीने ग्राम सत्कार

महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व वात्रटिकाकार माजी आमदार रामदासजी फुटाणे यांच्या भव्य ग्राम सत्काराचे जामखेडकरांकडून आयोजन करण्यात आले असुन ख्यातनाम कवी, लेखक व दिग्दर्शक नागराज मंजुळेही व गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व वात्रटिकाकार माजी आमदार रामदासजी फुटाणे हे जामखेड येथील मुळ रहिवासी असून महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे.

जामखेड येथे दरवर्षी संत नामदेव पुरस्कार व राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात येत होते. ही जामखेड वाशियांना मोठी मेजवानी होती पण काही वर्षापूर्वी हा कार्यक्रम पुण्यात घेतात

चित्रपट

सामना (चित्रपट) – १९७५ निर्मिती
सर्वसाक्षी (चित्रपट) – १९७९ पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन
सुर्वंता (चित्रपट) – १९९४ दिग्दर्शन
झुंड (हिंदी चित्रपट) – २०२२ कलाकार (भूमिका: कॉलेज प्रिन्सिपल)

पुरस्कार

सामना ( चित्रपट) : ३ राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर अवॉईस आणि राज्य पुरस्कार. १९७५ च्या बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, आणि महोत्सवात सहभाग.

सर्वसाक्षी (चित्रपट) : बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या ५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड.

सुर्वता (चित्रपट) : उत्कुष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५चा राज्य पुरस्कार; १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार; उत्कृष्ट दिग्दर्शनाचा १९९५चा वसंत जोगळेकर पुरस्कार.

‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश (१९९८).

‘फोडणी’ला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार (२००१) गोवा कला अकादमीचा काव्यहोत्र पुरस्कार (२४-७-२०१६) :
अश्या महान व्यक्तीमत्वाचा भव्य सत्कार अलिकडील काळात मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळा आयाम देणारे ख्यातनाम कवी, लेखक व दिग्दर्शक नागराज मंजुळे व गिरीशजी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ग्राम सत्कार होणार आहे.
जामखेड शहरातील ल. ना. होशिंग विद्यालयात रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here