जामखेड न्युज——
नायब तहसीलदार परमेश्वर पाचारणे यांचे हृदयविकाराने निधन

जामखेड येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार परमेश्वर आजीनाथ पाचारणे वय ५२ यांचे रात्री १.३० वाजता नाशिक येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे तहसील विभागासह जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

नायब तहसीलदार परमेश्वर पाचारणे यांचे मुळ गाव जामखेड तालुक्यातील सातेफळ हे आहे ते नाशिक येथे मुलभूत व पायाभूत बारा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते दिवसभर प्रशिक्षण केले रात्री अचानक छातीत दुखू लागले आणी यातच रात्री दिड वाजता निधन झाले यामुळे महसूल विभागात शोककळा पसरली आहे.

नायब तहसीलदार पाचारणे यांच्या मागे दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. अंत्यविधी सायंकाळी उशिरा त्याच्या गावी होईल.
चोकट
सध्या कर्मचारी खुपच मानसिक तणावामध्ये आहेत.
एका एका दिवसात अनेक कामे मार्गी लावावी लागतात. कृषीगणना, जिओ टँगिंग फोटो, पंचनामे यासह अनेक कामांचे मोठ्या प्रमाणावर मानसिक तणाव असतो. यामुळेच कर्मचारी मोठ्या प्रमाणात मानसिक तणावात असतात. यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.




