जामखेड न्युज——
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकत्यांचा वापर कढीपत्त्यासारखा – प्रा. सचिन गायवळ
राष्ट्रवादी सोडण्यासाठी सुरेश भोसले हेच कारणीभूत
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला विजयी करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकत्यांना कसलाही स्वाभिमान नाही. कसलीही किंमत नाही कढीपत्त्यासारखा वापर केला जातो. ज्या पक्षात कसलाही स्वाभिमान नाही त्या पक्षात काय म्हणून राहायचे ज्या पक्षात कामापेक्षा कानफुक्यांना जास्त किंमत दिली जाते त्या पक्षात कशासाठी राहावे म्हणून मी पक्ष सोडला यासाठी सुरेश भोसले हेच कारणीभूत आहेत असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी व्यक्त केले.
सोनेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी
भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रविंद्र सुरवसे, बिभीषण धनवडे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, उदय पवार, बापू माने, अप्पासाहेब ढगे, सरपंच पदमाकर बिरंगळ, उमेदवार सचिन घुमरे, गौतम उतेकर, जालिंदर चव्हाण, विष्णू भोंडवे, मच्छिंद्र गीते, तुषार पवार, गणेश लटके, शरद भोरे, सुरेश शिंदे, गणेश जगताप, अशोक महारनवर, शरद कार्ले, वैजीनाथ पाटील, डॉ. सिताराम ससाणे, नंदु गोरे सह सोनेगाव मधील ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. सचिन गायवळ म्हणाले की,
सोनेगाव सोसायटीत मला व माझ्या पत्नीला सचिव
गणेश बिरंगळ याच्या कडे सर्व कागदपत्रे देऊनही
सभासद करून घेतले नाही. त्यांना भीती अशी होती की, मी सदस्य झालो तर चेअरमन होईल व ग्रामपंचायत व सोसायटी आमच्या कडे येईल ही भीती होती. यामुळे आपले काहीच अस्तित्व राहणार नाही अशी भीती होती. पण मला दुसऱ्या गावाने सभासद करून घेतले आहे. मला कोणाला व्याजाने पैसे द्यायचे नाहीत. मला कोणाच्या जमिनी बळकावयाच्या नाहीत. घरे लुटायची नाहीत.
सुरेश भोसले यांनी आमदाराला फोन लावून सांगितले की, सचिन सर सोसायटी कडे लक्ष देतात,
परंतु मी सोसायटी निवडणूकीत पँनल करण्याच्या भुमिकेत नव्हतोच. त्याची गरजही नव्हती. परंतु कानफुक्यांच्या सांगण्यावरून आमदारांनी सुर्यकांत मोरे यांना सांगितले की, सचिन सरांना सांगा
सोसायटीत लक्ष घालू नका.आमदारांचा आदेश मी पाळला मला धनेगाव सोसायटीत सभासद करून घेण्यात आले. तसेच संचालक झालो, संचालक होताना मी हात जोडून मते घेतली.
सुरेश भाऊचा बँकेला अर्ज भरताना सुचक व अनुमोदकही त्यांच्या कडे नव्हते तरी त्यांचा अर्ज भरण्याचा फार्स केला. आमदारांनी राळेभात यांच्या वर दबाव आणला व निवडणूक लावली पण आमदारांनी सोनेगाव करांची म्हणजे सुरेश भोसले यांची जिल्हा बँक निवडणूकीत फसवणूक केली.
बाजार समिती निवडणुकीत आमदारांनी एकाही कट्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांचा फक्त वापरच होत असेल तर त्या पक्षासोबत जाण्यात काय अर्थ आहे.
आमचे चुलते छबुराव गायवळ व सुरेश भोसले यांना राळेभात यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती त्रास दिला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे.
सोनेगाव करांना जर मान स्वाभीमान असेल तर राळेभात बंधूच्या दडपशाही विरोधात एकजूट दाखवावी आणि आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला विजयी करावे.
मी ग्रामपंचायत मध्ये लक्ष घातले की सुरेश भोसले हे काड्या करायचे गायवळची सोनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी लक्ष घातले होते.
यावेळी त्यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला विजयी करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी केले.