जामखेड न्युज——
कुसडगाव ग्रामपंचायत व सेवा संस्थेचा सहकार व शेतकरी विकास आघाडीला एकमुखी पाठिंबा
विरोधी पँनलमधील गावातील उमेदवाराला एकही मत मिळणार नाही
जामखेड बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. दोन्ही पँनलची एकमेकांवर टीका टिप्पणी होत आहे. यातच कुसडगाव ग्रामपंचायत व सेवा संस्थेने सहकार व शेतकरी विकास आघाडीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. व प्रचारासाठी सर्व सदस्य बाहेर पडले आहेत. यामुळे तालुक्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गावातील उमेदवार शरद कार्ले हे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पँनलकडून उमेदवार आहेत तरीही गावातील ग्रामपंचायत व सेवा संस्था उमेदवारांनी आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. याची एकच चर्चा सगळीकडे आहे.
आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सहकार व शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी दादासाहेब सरनोबत (हवाशेठ), बापुसाहेब कार्ले यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी आबा कात्रजकर चेअरमन, रामदास शिरसाठ व्हाइस चेअरमन, नागेश कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, पोपट कार्ले, अमोल कार्ले (आबा), आबास कार्ले, सिताराम कात्रजकर, शहाजी वटाणे, कल्याण वटाणे
तसेच ग्रामपंचायत मधील
शहाजी गाडे सरपंच, रूपसुंदर कल्याण वटाणे उपसरपंच, दत्तात्रय कार्ले, मधुकर खरात, अकुंश कात्रजकर, मंजुषा संतोष भोगल, वंदना कात्रजकर, सतेज गंभिरे, काशीबाई जरांडे यांनी सर्वानी एकमुखी पाठिंबा देत प्रचारात सर्वच सक्रिय झाले.
पाठिंबा देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती संजय वराट, सुर्यकांत मोरे, हनुमंत पाटील, बापुसाहेब कार्ले, शरद शिंदे, सागर कोल्हे, ऋषिकेश पाटील सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्था सदस्य उपस्थित होते.
विकासाचे खरे व्हिजन आमदार रोहित पवार यांच्या कडे आहे तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून संचालक अमोल राळेभात यांनी आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास आघाडीला आम्ही एकमुखी पाठिंबा देत आहोत असे सदस्यांनी सांगितले.
गावातील उमेदवार आमदार राम शिंदे यांच्या पँनलमधून निवडणुक लढवत असताना त्यांना एकही मत मिळणार नाही. आज कुसगाव ग्रामपंचायत व सेवा संस्था पाठिंब्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.