महात्मा बसवेश्वरांनी समता आणि एकात्मतेचा संदेश जगाला दिला – तहसीलदार योगेश चंद्रे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जयंती साजरी

0
146

जामखेड न्युज——

महात्मा बसवेश्वरांनी समता आणि एकात्मतेचा संदेश जगाला दिला – तहसीलदार योगेश चंद्रे

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जयंती साजरी

सकल विरशौव लिंगायत समज दरवर्षी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करत असतो त्याच परंपरे प्रमाणे आज सकाळी अकरा वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आकर्षक सजावट करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बसवेश्वरांची आरती करण्यात आली जामखेड शहरातील प्रमुख ठिकाण म्हणजे खर्डा चौक आहे या ठिकाणी विविध महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात प्रथमच लिंगायत समाजाच्या वतीने या ठिकाणी जयंतीचे आयोजन केल्या बद्दल या समाजाचे मान्यवरांनी कौतुक केले.

बसवेश्वरांच्या जयंती रविवार दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. गणपती मंदिर मार्केट यार्ड ते शेटे मंगल कार्यालयापर्यंत भव्य अशी सवाद्य मिरवणुक निघणार आसल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की महात्मा बसवेश्वर हे महान कवी उत्तम प्रशासक क्रांतिकारक चळवळीचे प्रणेते होते त्यांनी समाज सुधारणेची चळवळ सुरू केली समाजातील अनिष्ट प्रथा रूढी दुर करत समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवत आपले आयुष्य झिजवले आहे.

त्यांनी समाजासाठी जो आचार विचार दिला आहे तो समाजाने आपल्या आचरणात आणावा व त्यांच्या प्रमाणे काम करावं हेच जयंतीचे फलीत आहे.

तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की जामखेड तालुक्यातील सर्व समाजातील बांधव गुण्यागोविंदाने राहात आहेत याचा अभिमान वाटतो समाजाच्या रचनेत प्रत्येक पन्नास वर्षेंनी बदल घडत असतो मागिल काळातील समाजात अनेक अनिष्ट रूढी परंपरा होत्या परंतु तत्कालीन समाज सुधारकांनी त्याला मुठमाती देत आदर्श असा समाज घडविण्याचे काम केले आहे त्यातील एक म्हणजे महात्मा बसवेश्वर आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकरआबा राळेभात,पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे डॉ. भास्कर मोरे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ अरूण जाधव, नगरसेवक बिभीषण धनवडे, अमित चिंतामणी, संजय कोठारी, मनोज कुलकर्णी, लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, पवन राळेभात, विवेक कुलकर्णी, प्रहारचे जयसिंग उगले, नय्युमभाई शेख, साऊ फौंडेशनच्या अध्यक्षा
संध्या सोनवणे, गणेश डोंगरे, वसीम सय्यद, उमर कुरेशी, राहुल उगले,अमोल लोहकरे, शिवलींग डोंगरे, राहुल लोहकरे, सागर लोहकरे, बजरंग सरडे, नागेश झाडबुक्के, गणेश गवसणे यांच्या सह अनेक मान्यवर व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here