कोरोना रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वत : वाढले जेवन

0
301
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
करोना संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे. कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आरोळे कोविड सेंटर व आमदार रोहित पवार यांचे नवनवीन प्रयोग सुरू आसतात. आरोळे कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्यातर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून आरोळे कोविड सेंटरला पन्नास आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन सुपूर्द करण्यात आल्या. तसेच कोरोना रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांना स्वतःच्या हाताने जेवन वाढले व तब्येतीची विचारपूस केली. यामुळे आमदार रोहित पवार हे आपल्या सामाजिक जाणीवेबद्दल चांगलेच चर्चेत आले आहेत.
नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार सतत कार्यरत आहेत. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी तो परतावा यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यास आ.रोहित पवार कटिबध्द आहेत. याच दृष्टिकोनातून रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन आरोळे कोव्हीड सेंटरला सुपूर्द केल्या. औषधोपचारासह रूग्णांना योग्य मानसिक आधार दिल्यास लवकरात लवकर रूग्ण बरे होतात यासाठी आमदार रोहित पवार यांनी रूग्णांना जेवन वाढले तब्येतीची चौकशी केली काळजी घेण्याचा सल्ला दिला.
   यावेळी आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे,
पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे उपस्थित होते.
               
      कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर लोक नातेवाईक या रूग्णांकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे कोरोना रूग्ण मानसिक दृष्ट्या खचतात आजारापेक्षा कोणी जवळ फिरकत नाही आपणास मोठा आजार झाला आहे असे लोकांना वाटते. पण जर रूग्णांना योग्य औषधोपचार व मानसिक आधार मिळाला तर रूग्ण लवकरात लवकर बरे होतात. म्हणूनच आमदार रोहित पवार यांनी आरोळे कोविड सेंटर मधील कोरोना रूग्णांशी संवाद साधला तब्येतीची चौकशी केली व स्वतःच्या हाताने जेवनही वाढले यामुळे कोरोना रूग्णांना चांगला मानसिक आधार मिळाला. व संपुर्ण मतदारसंघात एकच चर्चा होती आमदारांनी स्वतः जेवन वाढले.
   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here