जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरने राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे आतापर्यंत साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तेव्हा या आरोग्य सेवेचे महान कार्य करणाऱ्या संस्थेला दानशुरांनी मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते त्यानुसार आज खुरदैठण येथिल ग्रामस्थांनी अन्नधान्य व रोख स्वरूपात मदत केली.
तालुक्यातील खुरदैठण येथील ग्रामस्थ यांच्या वतीने डॉ.आरोळे कोविड हॉस्पिटला ४५ कट्टे धान्य व १७६०० रुपये रक्कम रोख स्वरूपात मदत देण्यात आली. ही मदत आरोळे कोविड सेंटरचे असिफ पठाण वसुसुलताना भाभी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांनी आरोळे हॉस्पिटल तर्फे खुरदैठण ग्रामस्थ व मंगेश आजबे यांचे आभार मानले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, उपसरपंच अविनाश ठाकरे, माजी उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संघटक अॅड. ऋषीकेश डुचे, चेरमन अंकुश सांगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कृष्णा डुचे, गहीनाथ इंगळे, तात्या सातपुते, मोहन मदने, अब्बास सय्यद, बबन सातपुते आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
