जामखेड न्युज——
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे – प्रा. मधुकर राळेभात
शेतकऱ्यांवरील अन्याय दुर न झाल्यास पुढील मोर्चा मार्केटवर – जहिर शेख
शासनाने कांदा अनुदानासाठी लावलेली ई-पिकपेरा अट रद्द करून तलाठ्यांमार्फत हस्तलिखित लावलेल्या नोंदी स्विकाराव्यात तसेच बाजार समितीच्या आवाराबाहेरील लायसन्स धारक व्यापाऱ्यांच्याही कांदा पट्ट्या स्विकारून शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान द्यावे. सरकारने कांदा लागवडीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नये. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा विक्रीच्या पट्ट्या व अहवाल मिळण्याबाबत मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी शासकीय नियमानुसार कांदा अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आला.

हा शेतकऱ्यांचा मोर्चा पंचायत समिती समोरून काढण्यात येऊन तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, जहीर शेख (जहीर ट्रेडर्स) कांदा व्यापारी बाळासाहेब पवार (दत्ता ट्रेडर्स) कांदा व्यापारी, सुनील लोंढे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ,सूर्यकांत नाना मोरे पंचायत समिती सभापती, समीर पठाण पाटोदा सरपंच, विजयराव पवार माजी सरपंच पाडळी, बापूसाहेब शिंदे आदर्श शेतकरी भीमराव लेंडे आदर्श शेतकरी, हनुमंत पाटील सकत सरपंच निलेश पवार भावी सरपंच बाळासाहेब खैरे पाडळी सरपंच नरेंद्र जाधव खांडवी सरपंच किसनराव ढवळे हळगाव सरपंच सुंदरदास बिरंगळ साहेब बावी सोसायटी चेअरमन, मा प. स. बबन देवकाते (शिऊर), सुनील आबा उबाळे सरपंच विलास मामा जगदाळे सोसायटी चेअरमन, बंडू वारे रत्नापूर सरपंच, बबनराव ढवळे रत्नापूर सोसायटी चेअरमन,गणेश हगवणे, प्रकाश सदाफुले, बबन तुपेरे, विजयसिंह गोलेकर, विशाल नेटके, जयसिंग डोके, नानाभाऊ ढवळे आदर्श शेतकरी गणेश ढगे, संतोष गोरे, रेवन राऊत, दीपक आबा वारे तमाम तालुक्यातील शेतकरी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
आदींसह तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होत आहे. शासनाने कांदा अनुदानासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून ई-पीकपेरा नोंदी बरोबर तलाठ्यांमार्फत लावलेल्या हस्तलिखित नोंदीही ग्राह्य धरून सर्वांना सरसकट अनुदान द्यावे. बाजार समिती बाहेरील परवाना धारक व्यापाऱ्यांच्याही खरेदी पावत्या ग्राह्य धराव्यात. शेतकऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कांदा अनुदानाबाबत जाचक अटी रद्द न केल्यास यापुढे तीव्र अंदोलन केले जाईल. तसेच शेतकरीही एकजूटीने राहुन आपल्यासाठी होणाऱ्या अंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शेतकऱ्यांचा पक्ष असून तो खंबीरपणे उभा राहिल असेही प्रतिपादन दत्तात्रय वारे यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते व पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रसन्न कात्रजकर, विजय पवार, भिमराव लेंडे, सरपंच निलेश पवार, नरेंद्र जाधव मंगेश आजबे आदी मान्यवरांचीही भाषणे झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवला.
चौकट
कांदा अनुदानाबाबत जाचक अटी रद्द न केल्यास मार्केट बाहेरील विक्री कांदा पट्ट्या न घेतल्यास यापेक्षा शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढू व शेतकरी मार्केटच्या दारातून हलणार नाहीत. मार्केट तर्फे पट्ट्या घेण्यासाठी पक्षपात केला जातो खर्डा येथील पट्ट्या घेतात आमच्या घेत नाहीत हा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत. पुढील भव्य दिव्य शेतकरी मोर्चा मार्केटच्या दारात असेल
जहिर शेख – जहीर ट्रेडर्स





