Friday, February 6, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड ग्रामपंचायतचे माजी लिपीक कचरू बापुराव नेटके यांचे निधन

जामखेड ग्रामपंचायतचे माजी लिपीक कचरू बापुराव नेटके यांचे निधन

0
209

जामखेड न्युज——

जामखेड ग्रामपंचायतचे माजी लिपीक कचरू बापुराव नेटके यांचे निधन

जामखेड शहरात ग्रामपंचायत असताना कचरू नेटके यांनी लिपीक म्हणून तीस वर्षे कार्यरत होते तत्कालीन काळात त्यांनी करवसुली करून ग्रामपंचायतला मोठा विकास निधि उपलब्ध करून दिला होता जामखेड शहराचा पुर्ण अभ्यास असणारे जाणते कर्मचारी म्हणून त्यांची ओळख जामखेडवासियांना होती.

तसेच रामायण महाभारत या ग्रंथाचा भावार्थ सांगण्यात त्यांचा नावलौकिक होता पुर्वीच्या काळात प्रत्येक गावामधे ग्रंथाची पोथी हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात होता या ग्रंथाचा वाचुन अर्थ सांगण्यात येत असे दिवंगत ह. भ. पण. तुळशीराम मुळे यांच्या समवेत अनेक ठिकाणी कचरू नेटके यांनी लक्ष्मण शक्ती या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता निवृत्तीनंतर त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून पारायन करत प्रवचने देत होते.

पाच एप्रिल रोजी बटेवाडी परिसरातील मारूती मंदिर येथे त्यांचा अपघात झाला या अपघातात त्यांच्या मेंदुला इजा झाली होती गेली चार दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु आज सकाळी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली
अत्यंत शोकाकुल वातावरणात जमदारवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!