जेनेरिकार्ट कंपनीने “जेनेरीकार्ट मेडिसिन” नावाचे आँनलाईन अँप्लिकेशन विकसित

0
245
नगर प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी असल्याने या काळात  औषधे खरेदी करणे सुलभ व्हावे याकरिता सामाजिकतेच्या भूमिकेतून  जेनेरिकार्ट कंपनीने जेनेरीकार्ट मेडिसिन नावाचे आँनलाईन अँप्लिकेशन विकसित केले असून त्याचे अनावरण महाराष्ट्र दिनी करण्यात आले ; नगरलाही हा अनावरण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
यावेळी  आमदार रोहित पवार, आमदार अशितोष काळे,
आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले , कंपनीचे  डिस्ट्रिक्ट हेड वसंत सानप उपस्थितीत होते.
या अँप्लेकशनमुळे आता जेनेरीकार्ट चे जेनेरिक औषधांचे दुकान शोधणे, औषधंच्या किमतीत किती बचत होते आणि नागरिकांना घरपोहच औषध सेवा मिळणार आहे. तसेच औषधे स्वस्त मिळणार आहेतच शिवाय डॉक्टर ऑनलाईन कन्सलटेशन, ऑनलाईन सर्व प्रकारच्या टेस्ट अशा सुविधा एका क्लिक वर मिळणार आहेत.
लॅब मधील सांगितलेली टेस्ट सहज उपलब्ध होण्याविषयी मार्गदर्शन मिळेल.  प्रिस्क्रिप्शन विषयी माहिती मिळेल.
 कोणती गोळी केव्हा घ्यावी याविषयी आठवण ही करून दिली जाईल. जेणेकरून वयस्कर लोकांना त्याचा खूप फायदा होईल.
                     
अशा पध्दतीचे मोबाईल अँप्लीकेशन विकसित करणारी ‘जनेरिकार्ट’ ही राज्यातील पहिली कंपनी ठरली आहे.याकरिता कंपनीचे संचालक श्रीपाद कोल्हटकर, सलीम सय्यद व वैभव नरगुंदे यांनी गेली सहा महिण्यापासून परिश्रम घेतले.
                                  जाहिरात
*अँप्लीकेशन  ‘कोरोना’ काळात ठरणार वरदान  !*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने नागरिकांकडून शासनाने निर्धारित करुन दिलेल्या नियम व आटींचे काटेकोरपणे पालन व्हावे, दररोज लागणाऱ्यां औषधांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये याकरिता हे मोबाईल अँप्लिकेशन खूप मोठा आधार ठरेल.नागरिकांना  गुगल प्ले वर “जेनेरीकार्ट मेडीसिन” सर्च करुन अँप्लिकेशन अपलोड करुन या सुविधेचा लाभ घेता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here