जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत यामुळे सामाजिक जाणिवेतून गावा गावातून व वाडी वस्ती वरून आरोळे कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे आज समस्त कोल्हेवाडी (साकत) येथील ग्रामस्थांनी आरोळे कोविड सेंटरला अन्नधान्य व भाजीपाल्याची मदत केली.

यावेळी आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना भाभी यांच्याकडे मदत सुपूर्द केली यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे,
पवनराजे राळेभात, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक कोल्हे, अशोक कोल्हे, अंगद फौजी, अस्तीक कोल्हे, रामभाऊ कोल्हे, कृष्णा कोल्हे, ब्रम्हा कोल्हे, शिवाजी कोल्हे यांच्या सह कोल्हेवाडी ग्रामस्थ हजर होते.
परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना आरोळे कोविड सेंटर मध्ये औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली जाते याचा फायदा अनेक गोरगरीब जनतेला झाला आहे. म्हणूनच सामाजिक जाणिवेतून कोल्हेवाडी ग्रामस्थांतर्फे आज ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ या अन्नधान्यासह कांदे, कोबी, लसूण या भाजीपाल्याची मदत केली आहे.

कोल्हेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना भाभी यांनी कोल्हेवाडी ग्रामस्थांचे आभार मानले.
जाहिरात
