जामखेड न्युज——
बाळासाहेबचे विचार व लेखणीची हातोटी संजय राऊतमध्ये – आमदार रोहित पवार
बाळासाहेबचे विचार व लेखणीची हातोटी संजय राऊत मध्ये आहे. वेगळे राजकीय समिकरण देशात देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती. सध्या देशात बेरोजगारी परिस्थिती भयानक आहे. ३५ टक्क्यांपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. पण हा आकडा लपवला जात आहे. हे वास्तव पत्रकारच समाजापुढे आणू शकतात. सध्या पत्रकारीतेत खुप अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाले. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत उपस्थित होते. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी खासदार संजय राऊत, स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरणजी नाईक, शरद पाबळे, संजय मिश्किल, परिषदेचे सरचिटणीस मन्सूर सय्यद, सुभाष गुंदेचा, संदीप कुलकर्णी, मिलिंद आष्टीकर, विजय जोशी, अनिल महाजन, अनिल वाघमारे, शोभाताई जयपूरकर, विठ्ठल लांडगे, नगराध्यक्ष उषा राऊत, कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, निलेश दिवटे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, मिठुलाल नवलाखा, अशोक निमोणकर, संतोष गर्जे, अजय अवसरे,लियाकत शेख, सुर्यकांत नेटके, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, पत्रकारच समाजात जागृती निर्माण करू शकतात काँग्रेस काळात आंदोलन दाबले जात नव्हते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी पत्रकारांची लेखनी महत्त्वाची होती. लोकांचा पत्रकारांवर जास्त विश्वास आहे सकारात्मक बातम्याही महत्त्वाच्या आहेत.
पत्रकार संघटना जास्त यामुळे पत्रकारांचीच ताकद कमी होते. पत्रकारिता बदलत आहे. आधुनिकता येत आहे आपणही बदलले पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे यासाठी पत्रकार स्वातंत्र्य हवे आहे.
सध्या देशात दडपशाही सुरू आहे. एकत्रित आले तरच ताकद वाढतेखऱ्या गोष्टी समाजापुढे आणण्यासाठी पत्रकार महत्त्वाचे काम आहे.
कार्यक्रमासाठी कर्जत- जामखेडचे पत्रकार एका महिन्यापासून झटत होते. पत्रकारांच्या वतीने विनंती
नवीन गोष्टी समजावून घेण्याची वृत्ती महत्त्वाची
पत्रकारीतेत खुपच अभ्यास महत्त्वाचा आहे
यावेळी खासदार संजय राऊत, स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरणजी नाईक, शरद पाबळे, संजय मिश्किल,
परिषदेचे सरचिटणीस मन्सूर सय्यद, सुभाष गुंदेचा, संदीप कुलकर्णी, मिलिंद आष्टीकर, विजय जोशी, अनिल महाजन, अनिल वाघमारे, शोभाताई जयपूरकर, विठ्ठल लांडगे, नगराध्यक्ष उषा राऊत, कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, निलेश दिवटे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद, संतोष गर्जे, अजय अवसरे,
पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, मिठुलाल नवलाखा, अशोक निमोणकर, लियाकत शेख, सुर्यकांत नेटके, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यातील विविध तालुका व जिल्हा पत्रकार पुरस्कार वितरण करण्यात आले
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा,
अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती,
लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली,
नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव,
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे,
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली,
औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद,
कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.