महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीसांतर्फे आयोजित रक्तदान शिबीरात चारशेपेक्षा अधिक जणांचे रक्तदान

0
285
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    कोरोना महामारीमुळे सध्या मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे हिच अडचण ओळखून जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त माझ जामखेड माझी जबाबदारी अंतर्गत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन रात्री उशिरा पर्यंत रक्तदान शिबीर सुरू होते. आठ वाजेपर्यंत चारशे युवकांनी रक्तदान केले होते.
     लॉकडाउनच्या काळात पोलिसांबद्दल काही खरे तर काही कथित मेसेज व्हायरल होत आहेत. गर्दी हटविण्यासाठी चालविलेली लाठी असो, वेगळ्या पद्धतीची शिक्षा असो की अन्नदानासारखे उपक्रम असो, त्यांची चर्चा होत आहे. जामखेड पोलिसांनी आता याही पुढे जाऊन सामाजिक भान जपणारा उपक्रम घेतला आहे. तरुणाईच्या मदतीने जामखेडमध्ये आज (१ मे) पोलिसांनीच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. घोषणेप्रमाणे आज लसीकरण सुरू झाले नसले तरी तरुणाईची पावले मात्र या शिबिराकडे पडताना दिसत होती त्यामुळे आठ वाजेपर्यंत चारशे रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
             गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, जामखेड पोलीसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याला कारणही तसंच आहे.
राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दिनांक 01 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून
जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
राज्यात 18 वर्षावरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या काळात पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता लसीकरणाआधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ पासून सोशल डिस्टन्सिंग पाळत सकाळ पासून तालुक्यातील युवकांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली. सायंकाळी आठ वाजेपर्यंत चारशे युवकांनी रक्तदान केले होते  रक्तदान सुरूच होते. या शिबिरात पोलीसांन बरोबरच तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व नागरिक खास परीश्रम घेतले त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रक्तदान शिबीराचा प्रतिसाद मिळाला.
                     
             चौकट
   जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवनवीन कल्पना राबविण्यास सुरुवात केली. शहरात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती अस्ताव्यस्त पार्किंग होती याचा त्रास सर्व सामान्य नागरीकांना होत होता यावर शहरातील रस्त्यांवर मार्किंग करून वाहतुकीची व पार्किंगची शिस्त लावली. तसेच अवैध धंद्यावर धाडी टाकून त्यांचा बंदोबस्त केला. तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगारी वाढली होती याचाही बंदोबस्त केला कायदा व सुव्यवस्था ठेवली. तसेच शाळा व काॅलेज मध्ये निर्भया अभियान राबवून मुलींना निर्भय बनविले. रोडरोमिओचा बंदोबस्त केला व आता सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते त्यामुळे कार्यक्षम आमदार रोहित पवार यांना कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची जोड मिळाली आहे.
                      जाहिरात
   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here