जामखेड न्युज——
जामखेड बाजार समितीसाठी आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जहीर शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परिसरातील प्रसिद्ध कांदा व्यापारी जहीर ट्रेडर्सचे संचालक जहीर शेख यांनी आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली आज बाजार समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शेतकरी व व्यापारी संघटनेकडुन आ. रोहित दादा पवार यांच्या कडे उमेदवारीसाठी मागणी केली.
जहीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व विविध अनुदानासाठी तसेच बाजारातील व्यापाऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
यावेळी संतोष गोरे, गणेश ढगे, अमोल ढगे, सदाशिव ढगे अरिफ शेख, आन्सार पठाण, भाऊसाहेब वराट, मुस्तफा शेख (मेजर) , सुंदरदास बिरंगल साहेब, निलेश पवार (बावी सरपंच) नय्युम शेख, कल्लीमुल कुरेशी (कलु चाचा), जाकीर सय्यद, हनीफ कुरेशी, अबरार कुरेशी, मारूफ कुरेशी, मदनीभाई कुरेशी तसेच बहुसंख्य शैतकरी व व्यापारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.