जामखेड न्युज——-
बाजार समितीसाठी अश्विनी रमेश (बाळासाहेब) ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज प्रचंड शक्तिप्रदर्शात दाखल
अश्विनी रमेश (बाळासाहेब) ठाकरे यांचा ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक व ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण असे दोन उमेदवारी अर्ज आज प्रचंड शक्तिप्रदर्शात दाखल करण्यात आले. शक्तिप्रदर्शनाने जामखेड करांचे वेधले लक्ष.
ढोलीबाजासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रँली काढण्यात आली होती. तालुक्यातील जवळपास ५५ ते ६० ग्रामपंचायत सदस्य व २५ ते ३० सेवा संस्था संचालकांसह समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली रँली शहरातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती.
जामखेड बाजार समितीची निवडणूक 18 जागेसाठी
यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3) ठिकाण – निवडणूक कार्यालय
अर्ज छाननी – 5 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता) ठिकाण – निवडणूक कार्यालय
वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता ) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड
अर्ज मागे घेण्याची तारीख – 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 ( सकाळी 11 ते दुपारी 3) निवडणूक कार्यालय
चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)
मतदान – 30 एप्रिल 2023 ( वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर घोषित करण्यात येईल
निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ( स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)
निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.