प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळातर्फे आरोळे कोविड सेंटरला सव्वा लाख रुपयांची मदत

0
372
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
           गेल्या तेरा महिन्यांपासून कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत त्यामुळे आरोळे कोविड सेंटरला मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे असे समजून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ जामखेड शाखेतर्फे आरोळे कोविड सेंटरला सव्वा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश आमदार रोहित (दादा) पवार यांच्या हस्ते कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
        ग्रामीण आरोग्य प्रकल्प अंतर्गत आरोळे कोविड सेंटर
 मार्फत गेल्या एक वर्षापासून कोविड रुग्णांना सेवाभावी वृत्तीने मोफत उपचार व औषधोपचार  केले जात आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळातर्फे  मदत निधी  देण्यात आला. यावेळी संघटनेमार्फत माननीय आमदार रोहित दादा पवार यांना शिक्षकांना प्राधान्याने कोव्हीड लस देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
       यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे,
तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, पत्रकार बंधु अशोक निमोणकर,मिठुलाल नवलाखा, धनराज पवार, सुदाम वराट, वसंत सानप संघटनेचे पदाधिकारी जिल्हा कार्याध्यक्ष किसनराव वराट, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त गोकुळ गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी विकास बगाडे, दशरथ हजारे, शहाजी जगताप, विनोद सोनवणे, श्रीहरी साबळे, संजय हजारे,  केशव हराळे, संभाजी कोकाटे, रामदास गंभीरे, दत्तात्रय यादव, सुनील कुमटकर, माजिद शेख, बबनराव गव्हाणे, केरू डोके,श्रीराम कांबळे, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष बापू पवार, जालिंदर भोगल, अनिल आव्हाड, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ दादा चव्हाण, मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहळकर, कार्याध्यक्ष गणेश नेटके, सरचिटणीस रामहरी बांगर, रुपेश वाणी, बापू कोळी, किरण माने, बाळासाहेब वाघ, श्रीराम कांबळे, मोहन खवळे, धीरज उदमले, मारुती रोडे, प्रसिद्धीप्रमुख राजीव मडके, महिला आघाडीच्या अध्यक्षा निशा कदम, उपाध्यक्ष सुलभा हजारे, उपाध्यक्ष नानासाहेब मोरे,सतीश सदाफुले, सचिन पवार, कार्याध्यक्ष अर्जुन पवार हे उपस्थित होते.
                     
     यापूर्वीही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळातर्फे मोलमजुरी करणार्‍या ११० कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. व आरोळे कोविड सेंटरला रोख स्वरूपात मदतही देण्यात आली होती.
      सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षकांनी आरोळे कोविड सेंटरला जी मदत केली आहे त्या मदतीबद्दल आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे यांनी शिक्षकांचे आभार मानले.
              जाहिरात
               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here