जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधन
आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत यामुळे आरोळे कोविड सेंटर हे परिसरासाठी जीवनदायिनी ठरलेले आहे. त्यामुळे या कोविड सेंटरला दानशुरांनी मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते त्यानुसार आज तालुक्यातील मतेवाडी येथील ग्रामस्थांनी अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सगळीकडे थैमान घातले आहे. खाजगी हाॅस्पिटलमध्ये लाखो रुपयांचे बील होत आहे तरीही पेशन्ट बरे होतील की नाही याची शाश्वती नाही. सध्या कोविड सेंटर म्हणजे पैसे कमावण्याचा धंदा सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात आरोग्य सेवेचा एक वेगळा ठसा आरोळे भावंडानी निर्माण केला आहे. कोरोना रूग्णांना औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणारे आरोळे कोविड सेंटर हे एकमेव उदाहरण आहे. म्हणून आरोळे कोविड सेंटरला मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अन्नधान्य, भाजीपाला, किराणा व रोख स्वरूपात मदत मिळवून दिली आणखीही मदतीचा ओघ सुरू आहे.
आज मतेवाडी येथील ग्रामस्थांनी मंगेश आजबे यांच्या आवाहनानुसार आरोळे कोविड सेंटरला अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केली. ही मदत आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना भाभी यांनी स्विकारली व मदतीबद्दल आरोळे कोविड सेंटरच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व मतेवाडी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, जवळयाचे सरपंच प्रशांत (भाऊ )शिंदे, अशोक पठाडे, अशोक मते, भाऊसाहेब कसरे ग्रामपंचायत सदस्य, रघुनाथ मते, गणेश मते, आजीनाथ पागिरे, विकास पागिरे उपस्थित होते.
जाहिरात

चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावी असे आवाहन मंगेश आजबे यांनी सोशल मिडीयावरून केले आहे यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात
