स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळशीराम केसकर यांची आरोळे कोविड सेंटरला दहा हजार रुपयांची मदत

0
195
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
   तेरा महिन्यात साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे करणार्‍या या सर्वांना चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला दानशुरांनी मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज तालुक्यातील तरडगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष तुळशीराम केसकर यांनी आरोळे कोविड सेंटरला दहा हजार रुपयांची मदत केली आहे.
      संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत करणारे आरोळे कोविड सेंटर हे एकमेव सेंटर आहे. त्यामुळे या सेंटरला परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते तसेच तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अन्नधान्य, भाजीपाला, किराणा व रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तालुक्यातून, जिल्ह्यातुन व जिल्ह्याबाहेरूनही मदतीचा ओघ सुरू आहे.  त्यांच्या आवाहनानुसार दररोज वेगवेगळ्या स्वरूपात मदत मिळत आहे. आज तालुक्यातील तरडगावं येथील शेतकरी पुत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष शहाजी तुळशीराम केसकर ( आबा ) यांनी आज डॉ. आरोळे कोविड हॉस्पिटल ला १० हजार रुपये देणगी दिली. हि मदत आरोळे कोविड सेंटरचे असिफ पठाण यांच्याकडे सुपूर्द केली.
       जाहिरात
      याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, तुळशीराम (आबा) केसकर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद दादा कार्ले,आसिफ पठाण आदी उपस्थित होते. मदतीबद्दल असिफ पठाण यांनी आरोळे कोविड सेंटरच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केसकर व मंगेश आजबे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here