जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या व तेरा महिन्यात साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे करणार्या आरोळे कोविड सेंटरला दानशुरांनी मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्ह्य़ातील भातोडी येथील जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने आरोळे कोविड सेंटरला एकवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
भातोडी ता. आष्टी जि. बीड येथील जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते माजी सरपंच सोमनाथ गीते, विद्यमान उपसरपंच विकास पांढरे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर शिंदे, महादेव शिंदे, अनिल धनवडे यांनी आरोळे कोविड सेंटरला एकवीस हजार रुपयांची मदत केली आहे. ही मदत आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले हे उपस्थित होते.
कोरोना रूग्णांवर ना महागडे औषधे, रेमडेसीवीर इंजेक्शन न वापरताही स्वस्तातील औषधे वापरून तसेच रूग्ण व नातेवाईकांना चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरने संपुर्ण राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तेव्हा सामाजिक दातृत्वाबद्दल समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्याबाहेरूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आज भातोडी ता. आष्टी जि. बीड येथील जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला मदत केली आहे याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे यांनी जय हनुमान मंडळाचे आभार मानले.

जाहिरात

तेरा महिन्यात साडेपाच हजार कोरोना रूग्णांना मोफत बरे करणार्या आरोळे कोविड सेंटरला दानशुरांनी मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले आहे.